Jump to content

कोकण रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोंकण रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

किमी
पनवेलकडे
रोहे (मुंबई छशिमट विभाग)
मध्य रेल्वे क्षेत्र
कोकण रेल्वे क्षेत्र (१ किमी)
१३ कोलाड (रत्नागिरी विभाग)
२४ इंदापूर
३० माणगाव
४१ गोरेगाव रोड
४७ वीर
सावित्री नदी
५५ सापे वामणे
६३ करंजाडी
७३ विन्हेरे
नातूवाडी बोगदा (४ किमी)
८० दिवाणखवटी
८६ कळंबणी बुद्रुक
जगबुडी नदी
९८ खेड
१११ अंजणी
१२८ चिपळूण
वाशिष्ठी नदी
चिपळूण बोगदा (२ किमी)
१३८ कामठे
सावर्डा बोगदा (३ किमी)
१४६ सावर्डा
जयगड नदी
१५६ आरवली रोड
आरवली बोगदा (२ किमी)
१६२ कडवई
१७० संगमेश्वर रोड
बाव नदी
परचुरी बोगदा (३ किमी)
उक्षी बोगदा (१ किमी)
१८४ उक्षी
उक्षी धबधबा
कर्बुडे बोगदा (६ किमी)
१९६ भोके
२०४ रत्नागिरी
पानवल नदी
टिके बोगदा (४ किमी)
२१९ निवसर
काजळी नदी
२३५ आडवली
बेर्डेवाडी बोगदा (४ किमी)
२४२ वेरवली
मुचकुंदी नदी
२५० विलवडे
२६० सौंदळ
अर्जुना नदी
२६७ राजापूर रोड
वाघोटण नदी
२७४ खारेपाटण रोड
२८४ वैभववाडी रोड
देवगड नदी
२९२ आचिर्णे
३०० नांदगाव रोड
जानवली नदी
३१५ कणकवली
गड नदी
कसाल नदी
३३२ सिंधुदुर्ग
कर्ली नदी
३४३ कुडाळ
३५३ झाराप
३६४ सावंतवाडी रोड
३७४ मडुरे
महाराष्ट्र
गोवा
राज्य
सीमा
रत्नागिरी विभाग
कारवार विभाग
तेरेखोल नदी
पेडणे बोगदा (१ किमी)
३८५ पेडणे
शापोरा नदी
३९६ थिविम
अस्सोनोरा नदी
मांडवी नदी
जुनं गोवा बोगदा (१ किमी)
४१४ करमळी
झुआरी नदी
४३० वेर्णा
वास्को द गामाकडे
४३५ माजोर्डा जंक्शन
४३८ सुरावली
४४२ मडगांव जंक्शन
लोंडा जंक्शनकडे
४५८ बल्ली
बार्सेम बोगदा (३ किमी)
४७५ काणकोण
तळपण नदी
गालजीबाग नदी
लोलये बोगदा (१ किमी)
४८५ लोलये
गोवा
कर्नाटक
राज्य सीमा
४९३ अस्नोटी
काळी नदी
५०१ कारवार
कारवार बोगदा (३ किमी)
५१५ हारवाड
हट्टीकेरी नदी
५२९ अंकोला
गंगवल्ली नदी
५३७ गोकर्ण रोड
५४८ मिर्जान
अघनाशिनी नदी
५५६ कुमटा
५७० होन्नावर
होन्नावर बोगदा (२ किमी)
शरावती नदी
५८८ मंकी
५९६ मुर्डेश्वर
६०४ चित्रापूर
वेंकटपूर नदी
६११ भटकळ
६१८ शिरूर
६२६ मुकांबिका रोड बैंदूर
बैंदूर नदी
६३२ बिजूर
सौपर्णिका नदी
६४६ सेनापुरा
चक्र नदी
पंचगंगवल्ली नदी
६६० कुंदापुरा
६७५ बारकुर
सीता नदी
स्वर्ण नदी
६९२ उडुपी
उद्यावर नदी
७०१ इन्नंजे
७०८ पडुबिद्री
७१७ नंदीकुर
शांभवी नदी
७२५ मुल्की
नंदिनी नदी
७३४ सुरतकल
७३८ ठोकुर (कारवार विभाग)
कोकण रेल्वे क्षेत्र (७४१ किमी)
दक्षिण रेल्वे क्षेत्र
17 - कोकण रेल्वे
१,३१९ मी (४,३२७ फूट) लांबीचा गोव्यामधील झुआरी नदीवरील पूल
कारवार रेल्वे स्थानक

कोकण रेल्वे हा मुंबईमंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे झाले आहे. रोहा ते रत्‍नागिरी या दरम्यान २२ फेब्रुवारीपासून २०२१पासून OHE अर्थात ओव्हरहेड इलेक्ट्रिक वाहिनीमधून २५ किलोव्होल्टचा विद्युत प्रवाह वाहतो. ४ मार्च २०२१ रोजी पहिल्यांदा विजेवर धावणारे इंजिन चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रोहा ते रत्‍नागिरी असे पहिले विद्युत इंजिन धावले. ही चाचणी यश्स्वी झाल्याने आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत.

इतिहास

[संपादन]

मुंबई व मंगळूर ह्या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी कोकणी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.

७४० किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्‍नागिरी उत्तर, रत्‍नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवारउडुपी ह्या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षे ३ महिन्याचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या. जवळपास ४७ हजार कुटुंब विस्थापित झाले.

मार्ग

[संपादन]
  • एकूण लांबी: ७४० किमी (४६० मैल)
  • स्थानके: ७२
  • वळणे: ३२०
  • मोठे पूल: १७९
  • सर्वाधिक लांबीचा पूल: २,०६५.८ मी (६,७७८ फूट) (होन्नावर येथे शरावती नदीवर)

प्रमुख रेल्वेगाड्या

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]