Jump to content

शरावती नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शरावती नदी
शरावतीचे पात्र
उगम अंबुतीर्थ, शिमोगा जिल्हा, कर्नाटक
मुख अरबी समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत
लांबी १२८ किमी (८० मैल)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २९८६ चौरस किमी

शरावती (कन्नड: ಶರಾವತಿ) ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक नदी आहे. ती कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यातील अंबुतीर्थ नावाच्या गावाजवळ उगम पावते व १२८ किमी पश्चिमेकडे वाहत येऊन होनावर गावाजवळ अरबी समुद्राला मिळते. जोग धबधबा हा आशियामधील सर्वात उंचीचा धबधबा शरावतीवरच आहे.

शरावतीवर लिंगणमक्की धरण व इतर काही धरणे बांधली गेली असून त्यांपासून जलविद्युत निर्मिली जाते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत