२०२३ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन शर्यतीचा ७४वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २२ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. ५ मार्च २०२३ रोजी बहरैन मध्ये पहिली तर २६ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
२०२३ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०२३ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे.
कतार ग्रांप्री २०२१ मध्ये शेवटच्या वेळी आयोजित झाल्यानंतर वेळपत्रकावर परत आली. ग्रांप्रीच्या सुरुवातीला नवीन उद्देशाने तयार केलेल्या सर्किटमध्ये हलवण्याची योजना होती, परंतु त्याऐवजी लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली.[२५][२६][२७]
लास व्हेगस ग्रांप्रीने २०२३ फॉर्म्युला वन हंगामात पुन्हा आपले पदार्पण केले, लास वेगास पट्टी ओलांडून नवीन स्ट्रीट सर्किट वर नोव्हेंबरमध्ये शर्यत झाली. लास वेगासमध्ये आयोजित केलेली शेवटची ग्रांप्री १९८२ सीझरस पॅलेस ग्रांप्री होती. १९८२ नंतर प्रथमच युनायटेड स्टेट्स मध्ये एकाच हंगामात तीन शर्यती आयोजित केल्या गेल्या.[२८][२९]
रशियन ग्रांप्री २०२३ फॉर्म्युला वन हंगामाच्या वेळपत्रकामध्ये शामिल करण्यासाठी एक वैशिष्ट्यीकृत करार केला गेला होता. त्या करारात ही शर्यत सोची ऑतोद्रोम वरून नोवोझिलोव्हो शहरातील इगोरा ड्राइव्ह येथे भरवायाची होती. नोवोझिलोव्हो शहर हे सेंट पीटर्सबर्ग पासून ५४ किलोमीटर (३४ मैल) अंतरावर आहे.[३०]परंतु, युक्रेनवरील रशियन युद्दाचा प्रतिसाद म्हणून करार रद्द करण्यात आला.[३१]
फ्रेंच ग्रांप्री २०२३ फॉर्म्युला वन हंगामाच्या वेळपत्रकामध्ये शामील नाही केली गेली, जरी ग्रांप्रीच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते की या ग्रांप्रीची जागा इतर ग्रांप्री सह शामील करून गोलाआकार पधतीने भरवण्याचा करार होता..[३२]
चिनी ग्रांप्री सुरुवातीला २०१९ मध्ये आयोजित केल्यानंतर पुन्हा २०२३ वेळपत्रकामध्ये शामिला झाली, परंतु कोविड-१९ महामारी मुळे सादर केलेल्या सततच्या अडचणींमुळे ती सलग चौथ्या वर्षी रद्द करण्यात आली.[३३]ते बदलले नाही.[३४]
एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री २०२३ हंगामातील सहावी फेरी म्हणून २१ मे रोजी भरवली जाणार होती, परंतु १७ मे, २०२३ रोजी परिसरात पूर आल्याने रद्द करण्यात आली.[३५]
मुख्य शर्यतीत पहिल्या १० वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवणाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. स्प्रिन्ट शर्यतीत पहिल्या ८ वर्गीकृत चालकांना खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत असे गुण देण्यात आले.
^अल्फा रोमियो's sponsorship arrangement was with स्टेक, whose co-founders were backers of किक. अल्फा रोमियो initially entered round २ as "अल्फा रोमियो एफ.१ संघ Kick",[१] before the publication of a second entry list that showed the entrant as "अल्फा रोमियो एफ.१ संघ Stake".[२] अल्फा रोमियो entered rounds ३, ७, १२ and १७ as "अल्फा रोमियो एफ.१ संघ Kick".[३][४][५][६]
^मॅक्स व्हर्सटॅपन set the fastest time in qualifying, but he received a five-place grid penalty for a new gearbox driveline.[३७]शार्ल लक्लेर was promoted to pole position in his place.[३८]