शांता शेळके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शांता शेळके


जन्म ऑक्टोबर १२, १९२२
इंदापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून ६, २००२
,महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार कथा, कादंबरी, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र

शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय, त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.

अनुक्रमणिका

जीवन [संपादन]

त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, तसेच शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय) झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयूग" मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुइया व दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापक म्हणून काम केले.

अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही त्यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे [१].

त्या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या.

शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली.[२]

प्रकाशित साहित्य [संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
रुपसी काव्यसंग्रह
तोच चंद्रमा काव्यसंग्रह सुरेश एजन्सी
एक गाणे चुलीचे काव्यसंग्रह स्नेहवर्धन प्रकाशन
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती सुरेश एजन्सी
आंधळी अनुवाद (हेलन केलरच्या चरित्राचा) मेहता प्रकाशन
गोंदण काव्यसंग्रह मेहता प्रकाशन
मधुसंचय परचुरे प्रकाशन
त्रिवेणी : गुलजार मेहता प्रकाशन
किनारे मनाचे मेहता प्रकाशन
रेशीमरेघा मेहता प्रकाशन
वडीलधारी माणसं ललित सुरेश एजन्सी
शान्तस्मरण मधुश्री प्रकाशन
सांगावेसे वाटले म्हणून मेहता प्रकाशन
कविता स्मरणातल्या काव्यसंग्रह मेहता प्रकाशन
धूळपाटी ललित सुरेश एजन्सी
रंगरेषा
जाणता अजाणता उत्कर्ष प्रकाशन
ललित नभी मेघ चार ज्ञानदा पब्लिकेशन्स
सुवर्णमुद्रा मेहता प्रकाशन
काही जवळ काही दूर
इतार्थ मेहता प्रकाशन
जन्मजान्हवी काव्यसंग्रह
श्रावण शिवरा उत्कर्ष प्रकाशन
संस्मरणे ललित
मनातले घर
बासरी (पुस्तक)
अनोळख मेहता प्रकाशन
आंधळ्याचे डोळे मेहता प्रकाशन
सतीचा वाडा उत्कर्ष प्रकाशन
वर्षा मेहता प्रकाशन
पावसाआधीचा पाऊस ललित मेहता प्रकाशन
अंगतपंगत मेहता प्रकाशन
पूर्व संध्या काव्यसंग्रह मेहता प्रकाशन
लेकुरवाळी उत्कर्ष प्रकाशन
चौघीजणी अनुवाद (लिटल वुमेन, गूड वाईव्ह्ज) मेहता प्रकाशन
अलौकिक उत्कर्ष प्रकाशन
मेघदूत अनुवाद मेहता प्रकाशन
पत्रं पुष्पं ज्ञानदा पब्लिकेशन्स
इतस्तत: उत्कर्ष प्रकाशन

प्रसिद्ध गीते [संपादन]

  • तोच चंद्रमा नभात
  • मी डोलकर डोलकर
  • जीवलगा राहिले रे दूर घर
  • गणराज रंगी नाचतो
  • मागे उभा मंगेश
  • रेशमांच्या रेघांनी
  • ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
  • वादळ वारं सुटलं ग
  • जाईन विचारीत रानफुला
  • ऋतू हिरवा, ऋतू बरवा

पुरस्कार [संपादन]

  • गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६
  • सुरसिंगार पुरस्कार (मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश)
  • केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल

गौरव [संपादन]

  • १९९६ आळंदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष

बाह्य दुवे [संपादन]

संदर्भ [संपादन]

  1. शांता शेळके १
  2. डॉ. वसंत अवसरे मागचा इतिहास (२८ मार्च २००९). २१ ऑक्टोबर २०११ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)