किरण नगरकर
| किरण नगरकर | |
|
|
|
| जन्म | इ.स. १९४२ मुंबई, महाराष्ट्र |
| कार्यक्षेत्र | साहित्य |
| राष्ट्रीयत्व | मराठी, भारतीय |
| भाषा | मराठी, इंग्रजी |
| साहित्यप्रकार | कथा, नाटक, समीक्षा |
| प्रसिद्ध साहित्यकृती | सात सक्कं त्रेचाळीस |
| पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. २००१) |
किरण नगरकर (इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक आहेत.
कारकीर्द [संपादन]
नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८च्या सुमारास अभिरुचीमध्ये प्रसिद्ध झाली [१]. नंतर तीच सात सक्कं त्रेचाळीस या नावाने मौज प्रकाशनाने इ.स. १९७४ साली प्रकाशित केली</ref name="मटा२०१२०११२">. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्यांमध्ये हिची गणना होते. त्यानंतर त्यांची रावण आणि एडी (इ.स. १९९४) ही कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. गॉड्स लिटल सोल्जर ही त्यांची केवळ इंग्रजीत प्रकाशित झालेली कादंबरी आहे. रावण अँड एडी ककल्ड (इ.स. १९९७) या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. इ.स. २००१ साली ककल्ड या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोजक्याच कादंबर्या लिहूनही ते लोकप्रिय झाले आहेत.ह्मयाशिवाय 'कबीराचे काय करायचे?' आणि 'बेडटाईम स्टोरी' ह्या दोन नाट्यकॄती त्यांच्या नावावर आहेत.'स्प्लिट वाईड ओपन' ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनय ही केला आहे. अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घेता येते.
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ सावंत,शशिकांत. "प्रयोगासाठी प्रयोग करणारा मी नाही!", महाराष्ट्र टाइम्स, १५ जानेवारी, इ.स. २०१२. १७ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी तपासले. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |