जी.के. ऐनापुरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जी.के. ऐनापुरे

जी.के. ऐनापुरे (घ.के. ऐनापुरे) यांनी दीर्घकथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारात लेखन कामगिरी केलेली आहे. याचबरोबर समीक्षालेखन आणि चित्रपटांविषयीही त्यांनी लेखन केलेले आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर हे ऐनापुरे यांचे मूळगाव. त्यांचे वडील मुंबईला गिरणी कामगार असल्याने त्यांची जडणघडण मुंबईतच झाली.

ऐनापुरे यांनी समुद्रविज्ञान विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

मुंबईमधल्या गिरण्यांचा संप आणि एकेक करून गिरण्या बंद होत लाखो गिरणीकामगार आणि त्यांचे कुटुंबीय उद्ध्वस्त, बेघर होत जाणे, या भयानक घटनेभोवती जी.के. ऐनापुरे यांचे बरेचसे साहित्य फिरताना दिसते. ऐनापुरे यांच्या अनेक कथांत कामगारांच्या खेळांचा संदर्भ येतो. कांदाचिर, रिबोट ही पुस्तकांची नावेदेखील खेळांशी संबंधित आहेत.

ऐनापुरेंच्या लेखनाचा परिचय[संपादन]

ऐनापुरे यांचे प्राथमिक कथालेखन १९८३ला सुरू झाले असले तरी त्यांचे व्यापक कथालेखन १९९५ पासून सुरू झाले. रिबोटला मिळालेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनसकट इतर पुरस्कारांनी ऐनापुरे यांचे नाव साहित्यक्षेत्रात चमकू लागले.


प्रकाशित साहित्य[संपादन]

  • अधुरा (कादंबरी, इ.स. २००६)
  • अभिसरण (कादंबरी, इ.स. २००२)
  • अवकाश (इ.स. १९९७)
  • कांदाचिर (दीर्घकथासंग्रह, इ.स. २००५)
  • जाईच्या घरी जाई (इ.स. २०१०)
  • झिंझुरडा (कथासंग्रह, इ.स. २०१२)
  • मराठी कथा : मूल्य आणि ऱ्हास (समीक्षा, इ.स. २०१६)
  • रिबोट (कादंबरी, इ.स. २००८)
  • सर्पसावल्या (या कथासंग्रहाची नवी आवृत्ती खंगोल या नावाने २०१० साली आली)
  • स्कॉलर ज्यूस (२०१६-कथासंग्रह)
  • निकटवर्तीय सूत्र (कथासंग्रह)
  • चिंचपोकळी (कथासंग्रह)
  • ग्रेसची कविता अर्थबोधाचे तपशील (समीक्षा) २०१५

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार आणि अन्य पुरस्कार (रिबोट या कादंबरीसाठी)
  • पुण्यात २० ते २४ फेब्रुवारी २०१९ या काळात भेरलेल्या ७व्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

मुलाखती[संपादन]

  • ‘खंगोल’मध्ये आत्माराम आठवले यांनी जी.के. ऐनपुरे यांची प्रदीर्घ मुलाखत छापली आहे.
  • व्यवस्थेच्या दारावर लेखक टाचा घासून मेला पाहिजे.. या नावाने २००५ साली एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित झालेली डॉ. मोहन पाटील आणि प्रा. यशवंत चव्हाण यांनी घेतलेली ऐनापुरे यांची मुलाखतही उपलब्ध आहे.

संदर्भ[संपादन]

जी.के. ऐनापुरे