श्याम मनोहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्याम मनोहर आफळे
श्याम मनोहर
टोपणनाव श्याम मनोहर
जन्म तासगाव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती कळ,उत्सुकतेने मी झोपलो,शीतयुद्ध सदानंद
वडील मनोहर आफळे
पुरस्कार साहित्य अकादमी

श्याम मनोहर उर्फ श्याम मनोहर आफळे (२७ फेब्रुवारी, इ.स. १९४१:तासगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - )[१] हे मराठी भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी इ.स. २००८चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. काँपिटिशन ही त्यांची पहिली कथा.[२]

श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीचे रहिवासी असून ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घर आहे.

श्याम मनोहर हे पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून २००१ साली निवृत्त झाले.

मनुष्य स्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.त्यांनी ‘कादंबरी’ या वाड्‌मय प्रकाराची परिभाषाच बदलली, असे म्हटले जाते. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव्र जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणाऱ्या भाषेतून प्रकट करतात.[३]

श्याम मनोहर यांनी आठ लघुकथासंग्रह, आठ नाटके व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

शैक्षणिक कारकीर्द[संपादन]

  • प्राथमिक शिक्षण : लिंब, अंगापूर आणि तासगाव, सातारा.
  • माध्यमिक शिक्षण : न्यू इंग्लिश स्कूल, सातारा.
  • बी.एस्‌सी. १९६४ : सायन्स महाविद्यालय, कराड, सातारा.
  • एम्.एस्‌सी. १९६७ : पुणे विद्यापीठ, पुणे

अध्यापन[संपादन]

लेखन कारकीर्द[संपादन]

कादंबरी[संपादन]

  • उत्सुकतेने मी झोपलो (२००६)
  • कळ (१९९६)
  • खूप लोक आहेत (२००२)
  • खेकसत म्हणणे आय लव्ह यू (२०१०)
  • शंभर मी (कादंबरी २०१२)
  • शीतयुद्ध सदानंद (१९८७)
  • हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (१९८३)

कथासंग्रह[संपादन]

  • दोन्ही : आणि बाकीचे सगळे बिनमौजेच्या गोष्टी (१९८०)
  • प्रेम आणि खूप खूप नंतर

नाटके[संपादन]

  • दर्शन (२००४)
  • प्रियांका आणि दोन चोर
  • प्रेमाची गोष्ट ? (१९९८)
  • यकृत (१९८७)
  • यळकोट (१९९३)
  • सन्मान हाऊस
  • हृदय (१९८५)

श्याम मनोहर यांच्या पुस्तकांचे अमराठी भाषांत झालेले अनुवाद[संपादन]

  • बहुत लोग है (हिंदी)
  • यकृत (कन्नड, मल्याळम, तेलुगू, तमिळ)
  • शीतयुद्ध सदानंद (कन्नड)
  • श्याम मनोहर कथेगळू (कन्नड)
  • हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव (कन्नड)

श्याम मनोहर यांच्याविषयीचे लेख व पुस्तके[संपादन]

  • लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण (लेख)
  • श्याम मनोहर: मौखिक आणि लिखित - संपादक : चंद्रकांत पाटील, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पहिली आवृत्ती २०१५, ISBN 987-81-71850418-9
  • 'लिमिटेड माणुसकी आणि अनलिमिटेड शहाणपण', समीक्षेचा अंतःस्वर या पुस्तकातील एक लेख - देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन पुणे,२०१०
  • श्याम मनोहरांच्या साहित्यातील जाणिवांचा शोध:एक अभ्यास याविषयी पीएच.डी. प्राप्त डॉ.जिजा शिंदे

पुरस्कार[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Shyam Manohar". www.goodreads.com. 2018-03-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Shyam Manohar". www.goodreads.com. 2018-03-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Shyam Manohar". www.goodreads.com. 2018-03-30 रोजी पाहिले.