नामदेव ढसाळ
नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते आहेत. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] जीवन
दलितांचे,शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आहे. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गोलपीठा भागात अत्यंत गरीबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धरतीवर त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.
१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारिक), आणि प्रियदर्शीनी (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा) प्रसिद्ध झाले.
[संपादन] कारकीर्द
साठोत्तरी मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली कवी. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या आणि भाषिक दृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक. आंबेडकरी चळवळीशी विशेषत: दलित चळवळीशी बांधिलकी. लिखाणावर लघुनियतकालिके, मनोहर ओक, त्याचबरोबर काही प्रमाणात दिलीप चित्र्यांचा प्रभाव दिसतो.
[संपादन] पुस्तके
[संपादन] कविता संग्रह
- गोलपीठा (१९७२)
- खेळ (१९८३)
- मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)
- तुही यत्ता कंची (१९८१)
- या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
- मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात
- तुझे बोट धरुन चाललो आहे
- आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६)
- गांडू बगीचा (१९८६)
[संपादन] नाटक
- अंधार यात्रा
[संपादन] कादंबरी
- हाडकी हाडवळा
- निगेटिव स्पेस्
[संपादन] इतर
आंधळे शतक ।- मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
[संपादन] पुरस्कार
- बुद्ध रोहिदास विचार गौरव - इ.स. २००९
- साहित्य जीवन गौरव पुरस्कार २००४ [१]
- पद्मश्री पुरस्कार
[संपादन] संदर्भ
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||