विश्वनाथ वामन बापट
विश्वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट (२५ जुलै, इ.स. १९२२ - २७ सप्टेंबर, इ.स. २००२) हे मराठी कवी होते.
जीवन [संपादन]
बापटांचा जन्म २५ जुलै, इ.स. १९२२ रोजी महाराष्ट्रात कर्हाड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर 'नॅशनल कॉलेज आणि 'रामनारायण रूईया कॉलेज' हया महाविद्यायलयांतून मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक होते. इ.स. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरूदेव रवींद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. बापट भारताच्या स्वांतत्र्यलढ्यातही सहभागी झाले होते. इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत ते सहभागी होते. ऑगस्ट, इ.स. १९४३ ते जानेवारी, इ.स. १९४५ पर्यंत ते तुरूगांत होते. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ ते पर्यंत ते मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक होते. इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ ते साधना नियतकालिकाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते. इ.स. १९७२ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. लहानपणापासून बापटावर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. 'बिजली' हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा' , 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहील्या.
पौराणिक एतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली `केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची सकीना उर्दूचा खास लहेजा होऊन प्रकटली आणि, `तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा, सांगून गेली.
इ.स. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. इ.स. १९७७, इ.स. १९९३ मध्ये अमेरिकेत आणि इ.स. १९९२ मध्ये आखाती देशांत त्यांचा काव्यदर्शन कार्यक्रम झाला. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह, तर बालगोविंद हे बालनाट्य लिहिले.
बाह्य दुवे [संपादन]
- वसंत बापटांनी लिहिलेली गाणी. आठवणीतली-गाणी.कॉम. (मराठी मजकूर)
- आपला प्रदेश वसंत बापट यांचा लेख. मराठीमाती. (मराठी मजकूर)
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||