रामचंद्र चिंतामण ढेरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामचंद्र चिंतामण ढेरे


रामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : निगडे-पुणे जिल्हा, २१ जुलै[१], इ.स. १९३० - पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे शारदा आणि पत्‍नीचे इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.

रा. चिं. ढेरे आणि इंदुबाला यांचा १९५५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी ६१ वर्षे संसार केला होता. रा.चिं ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले तर इंदुबाला ढेरे १७ जानेवारी २०१७ला देवाघरी गेल्या

कार्य[संपादन]

प्राच्यविद्या संशोधन केंद्रात त्यांनी अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात यांनी खास कार्य केले असे म्हणता येते. त्यांची नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, "त्रिविधा', श्रीपर्वताच्या छायेत आणि इतर पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ, अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. इतिहासाचे लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे, कागदपत्रांमधील माहितीचे सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भही ताडून पाहणे आवश्यक अशी त्यांची भूमिका होती.

लहानपण[संपादन]

ढेरे यांचे बालपण व उमेदवारीचा काळ विपरीत परिस्थितीत गेला. वयाच्या पाचव्या वर्षी आई वडील वारले. शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी कामे उपजीविकेसाठी ते करीत. शंकराजी नारायण पारितोषिकासाठी ढेरे यांनी नाथसंप्रदायावर संशोधनपर लिखाण केले होते. त्यांनी संशोधनाने सिद्ध केलेला ‘चक्रपाणी’ हा प्रबंध सादर केला. तोही एम.ए. न होता थेट पीएच.डी. साठी. अपवाद म्हणून हा प्रबंध स्वीकारण्यात आला होता. 'षट्स्थल एक अध्ययन' या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली.[२]

संग्रह[संपादन]

रा. चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अमृतकन्या
श्री आनंदयात्री
आज्ञापत्र संपादित पद्मगंधा प्रकाशन १९६०
इंद्रायणी ९ लेखांचा संग्रह
एका जनार्दनी पैठणची माहितीपुस्तिका
कथापंचक
करवीरनिवासी श्री महालक्ष्मी
कल्पद्रुमाचे तळी
कल्पवेल
गंगाजल
श्री गुरूंचे गंधर्वपूर गाणगापूरची माहितीपुस्तिका
श्री गुरुदेव दत्त औदुंबर-नरसोबाची वाडी यांचे माहितीपुस्तक
श्रीगोदे भवताप हरी नासिक-त्र्यंबकेश्वर माहितीपुस्तिका
महात्मा चक्रधर बालवाङ्मय
चित्रप्रभा
जागृत जगन्‍नाथ जगन्‍नाथपुरीची माहितीपुस्तिका
तुका झाले कळस देहूची माहितीपुस्तिका
श्रीतुळजाभवानी धार्मिक पद्मगंधा प्रकाशन
तेजस्वी धर्मोद्धारक आदि शंकरार्यांचे ्लघुचरित्र
त्रिभुवनेश्वर लिंगराज भुवनेश्वरचे माहितीपुस्तक
त्रिविधा पद्मगंधा प्रकाशन
दत्त संप्रदायाचा इतिहास
दलितांचा कैवारी भार्गवराम परशुरामक्षेत्राची माहितीपुस्तिका
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा
नागेशं दारुकावने औंढा नागनाथची माहितीपुस्तिका
नाथ संप्रदायाचा इतिहास
श्रीनाथलीलामृत धार्मिक केशव भिकाजी ढवळे
नामदेव : एक विजययात्रा
नामयाची जनी
श्री नृसिंह सरस्वती
श्री पर्वतीच्या छायेत पद्मगंधा प्रकाशन
पुण्याई
प्रवासी पंडित ह्यू एन त्संगच्या प्रवासाची माहिती
प्राचीन मराठीच्या लोकधारा
प्राचीन मराठी वाङ्मय : शोध आणि संहिता
बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराची माहितीपुस्तिका
बोरकरांची प्रेमकविता संपादित
भक्तिवेडी बहिणा
भारतीय रंगभूमीच्या शोधात
मंगलमूर्ती मोरया चिंचवड-मोरगावची माहितीपुस्तिका
महाकवीची बखर संपादित १९७३
महामाया सहलेखिका-तारा भवाळकर
महाराष्ट्राचा गाभारा
श्रीमहालक्ष्मी
मातापुत्राची जगन्माता देवीच्या साडेतीन पीठांची माहितीपुस्तिका
मानसयात्रा
मामदेव, जनी आणि नागरी पद्मगंधा प्रकाशन
मार्तंडविजय संपादित १९७५
मुक्तिगाथा महामानवाची
मुसलमान मराठी संतकवी
रामराज्याची स्फूर्तिकेंद्रे
रुक्मिणी स्वयंवर संपादित १९६५
योगेश्वरीचे माहेर अंबाजोगाईची माहितीपुस्तिका
लज्जागौरी (ग्रंथ) पद्मगंधा प्रकाशन
लोकदेवतांचे विश्व
लोकसंस्कृतीचे उपासक पद्मगंधा प्रकाशन
लोकसंस्कृतीचे विश्व
लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा
लौकिक आणि अलौकिक
सरदार वल्लभभाई
श्रीविठ्ठल : एक महासमन्वय धार्मिक
विराग आणि अनुराग
विविधा
श्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वर पद्मगंधा प्रकाशन
श्री शारदामाता
शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव
शिव-दिग्विजय संपादित १९७५
शोधशिल्प
श्रीकृष्ण चरित्र संपादित १९७२
संत, लोक आणि अभिजन धार्मिक पद्मगंधा प्रकाशन
संतांच्या आत्मकथा
संतांच्या चरित्रकथा
सुभद्रा स्वयंवर संपादित १९६७
श्री स्वामी समर्थ धार्मिक, बखर अनमोल प्रकाशन
ही चिरंतनाची वाट
क्षिप्रेच्या सोनेरी आठवणी उज्जयिनीची माहितीपुस्तिका
ज्ञानोबा माऊली आळंदीची माहितीपुस्तिका

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ डॉ. अजय दांडेकर. "अविरत शोधयात्री". Archived from the original on 2012-11-30. १९ जुलै, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे निधन". www.evivek.com. Archived from the original on 2017-02-02. 2016-08-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]