शरद घनश्याम गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शरद गोखले या पानावरून पुनर्निर्देशित)

शरद घनश्याम गोखले (मे २६, इ.स. १९४० - सप्टेंबर २०, इ.स. २०११) हे मराठी संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेते होते.

शिक्षण[संपादन]

वयाच्या तेराव्या वर्षापासून सतत बारा वर्षे त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे संगीत अलंकारपर्यंत गायनाचे शिक्षण घेतले[१]. रामचंद्र पटवर्धन यांच्याकडून त्यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतले.

जीवन व कार्य[संपादन]

पुणे विद्यार्थी गृहाचे महाराष्ट्र विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे इ.स. १९६५ ते इ.स. १९९९ पर्यंत अध्यापक म्हणून गोखल्यांनी काम केले. जयराम शिलेदार यांच्या मराठी रंगभूमी संस्थेत ते इ.स. १९७४ साली दाखल झाले[२]. कीर्ती शिलेदार यांच्याबरोबर त्यांनी संगीत सौभद्र, स्वयंवर, संगीत शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी, विद्याहरण, संगीत शारदा, कान्होपात्रा आणि एकच प्याला या संगीत नाटकातून त्यांनी नायकाच्या भूमिका केल्या.

पुरस्कार[संपादन]

  • जीवनगौरव पुरस्कार (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे)
  • माणिक वर्मा पुरस्कार
  • नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार (सांगलीच्या देवल स्मारक समितीतर्फे)
  • बालगंधर्व पुरस्कार (पुणे महापालिकेतर्फे)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "व्यक्तिवेध : शरद गोखले[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "महाराष्ट्र टाइम्स:माणसं". १४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)