तुकाराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संक्षिप्त सूची
संत तुकाराम.jpg
पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
उपाख्य तुकोबा, तुका
जीवनकाल १५९८ देहूगाव (पुणे)
ते
१६४९ देहूगाव (पुणे)
आई-वडिल बोल्होबा अंबिले (मोरे)
पत्नी आवळाबाई - पुणे येथील आप्पाजी गुळवे यांची कन्या
कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक.
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ.
संत साहित्य पाच हजारांवर अभंगांची रचना


हा लेख संत तुकाराम या व्यक्तीबद्दल आहे. 'संत तुकाराम' चित्रपट तसेच इतर प्रकारच्या माहितीसाठी येथे भेट द्या.

संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके संत आहेत.

ज्या काळात संत तुकाराम महाराष्ट्रात पुण्याजवळच्या देहू गावी जन्माला आले त्याच काळात अनेक संत होऊन गेले. म्हणून त्या काळाला भक्तियुग म्हणतात. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार लोकिप्रय तारखा १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मधे एका सार्वजनिक समारंभात, श्री विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले अशी मान्यता आहे. विष्णूचे दुसरे रूप असलेला पंढरपूरचा श्री विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा लाडका देव होता.

[संपादन] जीवन

संत तुकारांमांचा परंपरागत सावकारीचा व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमीनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचन कीर्तने करतांना तुकारामांना अभंगांची रचना स्फूरू लागली. त्यांचा बालपणीचा मित्र सुदुंबरे गावातील संताजी जगनाडे यांनी सर्व अभंग लिखाणाचे काम केले व ते अभंग तुकारामांनी परत लिहुन काढले. देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु तुकारामांच्या पत्नी आवली ने त्यांना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांची नम्रता व त्यांची भक्ती पाहून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुणे या गावा जवळील वाघोली येथील रामेश्वर भट यांनी तुकारामाला संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. पण त्या गाथा बुडाल्या नाहीत. तेरा दिवसांनी नदीतून परत वर आल्या. हे पाहून रामेश्वर भटांना पश्चात्ताप झाला व त्यांनी तुकारामांचे शिष्यत्व पत्करले.

संत तुकारांमांसाठी शिवाजी राजांनी नजराणा पाठवला. परंतु संसारातून मन उडालेल्या संत तुकारामांनी तो परत केला. मग पुणे या शहराजवळील लोहोगाव येथे शिवाजी राजे स्वतः किर्तनाला आले. वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले.

[संपादन] वंशावळी

  • विश्वंभर आणि आमाई अंबिले

यांना दोन मुले हरि व मुकुंद

  • यातील एकाचा मुलगा विठ्ठल
  • पदाजी अंबिले
  • शंकर अंबिले
  • कान्हया अंबिले
  • बोल्होबा आणि कनकाई अंबिले

यांना दोन मुले

  • सावजी (मोठा) तिर्थ यात्रेला जाण्यासाठी घर सोडले.
  • संत तुकाराम (लहान)

[संपादन] बाह्यदुवे

  1. मराठीचे मानदंड संत तुकाराम महाराज
  2. संत तुकारामांविषयीचे एक संकेतस्थळ
  3. संत तुकारामांविषयी
  4. तुकाराम गाथा
वारकरी संप्रदायातील संत
संत ज्ञानेश्वर - संत नामदेव - संत गोरोबा कुंभार - संत तुकाराम - संत एकनाथ