बाळकृष्ण हरी कोल्हटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाळकृष्ण हरी कोल्हटकर
जन्म नाव बाळकृष्ण हरी कोल्हटकर
जन्म सप्टेंबर २५, इ.स. १९२६
मृत्यू जून ३०, इ.स. १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाट्यलेखन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, नाटक

बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर, (जन्म : सातारा, २५ सप्टेंबर १९२६, - ३० जून १९९४) हे मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरिताचे तिमिर जावो[१], वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले[२]. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.

जीवन[संपादन]

कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार नावाचे नाटक लिहिले[२]. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले[२].

कारकीर्द[संपादन]

नाटके[संपादन]

नाटक वर्ष प्रकाशन भाषा सहभाग
आकाशगंगा मराठी लेखन
एखाद्याचे नशीब मराठी लेखन
दुरिताचे तिमिर जावो मराठी लेखन
देणाऱ्याचे हात हजारो मराठी लेखन
देव दीनाघरी धावला मराठी लेखन
मुंबईची माणसं मराठी लेखन
लहानपण देगा देवा मराठी लेखन
वाहतो ही दुर्वांची जुडी इ.स. १९६४ मराठी लेखन
विद्या विनयेन शोभते मराठी लेखन
वेगळं व्हायचंय मला मराठी लेखन

सिमेवरून परत जा अंगाई वाऱ्यात मिसळले पाणी उघडले स्वर्गाचे दार

संदर्भ[संपादन]

  1. ^ "व्यावसायिक असूनही प्रायोगिकतेचा पाठीराखा". Loksatta. 2020-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ a b c एन्सायक्लोपेडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर (मराठी साहित्यविषयक ज्ञानकोशीय शब्दसंग्रह) (इंग्लिश भाषेत). p. ३३५.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]