यशवंत दिनकर फडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशवंत दिनकर फडके
पूर्ण नाव यशवंत दिनकर फडके
जन्म जानेवारी ३, १९३१
सोलापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जानेवारी ११, २००८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र साहित्य, इतिहास
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार चरित्रलेखन
विषय इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती विसाव्या शतकातील महाराष्ट्र

यशवंत दिनकर फडके (जानेवारी ३, १९३१ - जानेवारी ११, २००८) हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

जीवन[संपादन]

फडक्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१ रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्‌.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्‌.डी. पदवी मिळवली.

प्रकाशित साहित्य[संपादन]

चरित्रलेखन[संपादन]

  • शोध बाळगोपाळांचा (१९७७)
  • र. धों. कर्वे (१९८१)
  • केशवराव जेधे (१९८२)
  • शोध सावरकरांचा (१९८४)
  • लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक (१९८५)
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर (१९८६)
  • अण्णासाहेब लठ्ठे (१९९०)
  • कहाणी सुभाषचंद्रांची (१९९४)
  • आगरकर (१९९६)

ऐतिहासिक[संपादन]

  • डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह (१९८६)
  • डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (१९८६)
  • डॉ. आंबेडकराचे मारकरी : अरुण शौरी (१९९९)
  • विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९४७) - खंड १ ते ८

ललित[संपादन]

  • दृष्टादृष्ट (१९९२)
  • शोधता शोधता (१९९५)
  • व्यक्तिरेखा (१९९८)
  • स्मरणरेखा (१९९८)
  • नाही चिरा नाही पणती (२०००)

हेही वाचा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]