नलेश दत्तात्रेय पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नलेश पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
नलेश पाटील
जन्म नाव नलेश दत्तात्रेय पाटील
जन्म २९ जानेवारी, इ.स. १९५४
पालघर, महाराष्ट्र
मृत्यू ७ सप्टेंबर, इ.स. २०१६
मुंबई
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
प्रसिद्ध साहित्यकृती कवितांच्या गावा जावे
वडील दत्तात्रेय परशराम पाटील
आई हेमलता दत्तात्रेय पाटील
अपत्ये सावली

नलेश पाटील (जन्म : पालघर, २९ जानेवारी, इ.स. १९५४; - मुंबई, ७ सप्टेंबर, २०१६) हे मराठी भाषेतील एक कवी होते. ते आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीद्वारे पहाडी आवाजात कविता सादर करत असत. झाडे, पाने, फुले, घरटी, पक्षी, आभाळ, ऊन, पाऊस, समुद्र, बदलणारे ऋतू अशा निसर्गदत्त घटक हे त्यांच्या कवितेच्या अग्रस्थानी असायचे.

जीवन[संपादन]

नलेश पाटील यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी नलेश पाटील यांचा मराठीचा गाढा अभ्यास होता. त्यांचे कलाविषयक मुंबईच्या जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट या संस्थेत झाले होते. ते एका अमेरिकन कंपनीत क्रिएटिव्ह डायरेक्टर होते.कवितांच्या गावा जावे' हा त्यांच्यासह अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित काव्य गायन समारंभ असे. या रंगमंचीय कार्यक्रमामुळे नलेश पाटील यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. 'नक्षत्रांचे लेणे' या दूरचित्रवाणीवरील कार्यकर्माताही त्यांच्या कविता गायल्या गेल्या.

'टूरटूर' आणि 'हमाल दे धमाल' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनही केले आहे.

नलेश पाटील यांच्या लोकप्रिय कवितांतील काही ओळी[संपादन]

  • १. काय चालले असेल त्या झाडाच्या खोल मनात?

झाडावरले हिरवे झाकण उचलून पाहू आत..

  • २. नभ तळ्याच्या मंचकी,

निळ्या ऐटीत बसले..

  • ३. मंद केशराचा थवा काळ्या मातीवरी खेळी,

गळा डोंगराच्या रुळे ऊन पाण्याची साखळी..

  • ४. पानसावरी दिवे उन्हाचे तेज ठिबकते रानी सारे;

हिरव्या हातांवरती वाटते उतरून ऊन पाणी झाले..

  • ५. दोर नदीचा धरून गेलो डोंगर चढून,

मी सोवळ्या धुक्यात गेलो आकाशी पोहून.

  • ६. अशा नाजूक उन्हाच्या कोकणस्थ घाऱ्या सरी

नेसतात माळावरी हिरवळ नऊवारी..

  • ७. आभाळाला खडा मारता, पाण्यालाही तडाच गेला;

खळ्कन फुटले पाणी आणि अंगावरती उडली गाणी;
त्या गाण्याच्या शिंतोड्यांचा अंगि शहारा ओला ओला..

  • ८. विचार चाललाय,

पंक्चर करून एक ढग, पेरावा अंगणात कारंजे म्हणून.

  • ९. खुळे चातकाचे डोळे

जणू नभ पाणावले
आर्त नजरेमधुनी
दिस पावसाचे आले

  • १०. टिंब पाण्याचे झेलीत

पान फुटले वेलीत
किती दिसाने ओढा
मंजूळ झाला गं.. झाला गं..
पाऊस आला गं..

  • ११. लचकतेय झुळुक

थेंब वाजती खुळ्ळुक
हिरवागार झाला पुन्हा
मातीमधला काळोख..

  • १२. पाऊस ठेवून जातो झाडांच्या पायाजवळ आरसे

अन् झाडे ऋतूभर मश्गुल आपल्याच रूपात..

नलेश पाटील यांचे प्रकाशित काव्यसंग्रह[संपादन]

  • कवितांच्या गावा जावे
  • हिरवं गाव