दीनानाथ गणेश मंगेशकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दीनानाथ मंगेशकर या पानावरून पुनर्निर्देशित)
दीनानाथ मंगेशकर
Dinanath Mangeshkar.jpg
दीनानाथ गणेश मंगेशकर
आयुष्य
जन्म डिसेंबर २९, इ.स. १९००
जन्म स्थान गोवा, पोर्तुगीज भारत
मृत्यू एप्रिल २४, इ.स. १९४२
मृत्यू स्थान ससून रुग्णालय, पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
पारिवारिक माहिती
आई येसूबाई राणे
वडील गणेश भट अभिषेकी
जोडीदार माई मंगेशकर (पूर्वाश्रमीचे नाव: शेवंती लाड)
अपत्ये लता मंगेशकर,
मीना मंगेशकर,
आशा भोसले,
उषा मंगेशकर,
हृदयनाथ मंगेशकर
संगीत साधना
गुरू बाबा माशेलकर,
रामकृष्णबुवा वझे
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन,
नाट्यसंगीत
संगीत कारकीर्द
कार्य बलवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना,
बलवंत पिक्चर्स
कार्यक्षेत्र संगीत, अभिनय

दीनानाथ मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९०० - एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. जे कलावंत अगदी लहान वयापासून कला क्षेत्रात असतात त्यांना मराठीत बाल, बाल कलाकार, बेबी किंवा मास्टर म्हणायची पद्धत आहे. दीनानाथांना याच कारणास्तव मास्टर दीनानाथ असे म्हणतात.

मास्टर दीनानाथांनी अभिनय केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)[संपादन]

 • उग्रमंगल (?)
 • चौदावे रत्न (त्राटिका)
 • झुंझारराव (जाधवराव)
 • पुण्यप्रभाव (कालिंदी,किंकिणी)
 • ब्रह्मकुमारी (गौतम)
 • भावबंधन (लतिका)
 • मानापमान (धैर्यधर)
 • रणदुंदुभी (वेणू)
 • राजसंन्यास (पद्मावती)
 • रामराज्यवियोग (शिवांगी)
 • वेड्यांचा बाजार (राम)
 • शाकुंतल(शकुंतला)
 • शारदा (शारदा)
 • संन्यस्त खड्ग (सुलोचना)

मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी)[संपादन]

दीनानाथ मंगेशकर स्मारके[संपादन]

दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या काही संस्था  :

 • गोव्यातील कला अकादमीमधले मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृह
 • दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
 • दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी)
 • मास्टर दीनानाथ सभागृह (गोव्याच्या कला अकादमीतले एक सभागृह)


दीनानाथ मंगेशकर पुरस्कार[संपादन]

दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयीपुरस्कार, (२) मोहन वाघ पुरस्कार, (३) वाग्विलासिनी पुरस्कार (४)रंगभूमी पुरस्कार आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख( सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.

आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती, संस्था, कलाकृती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
आपले घर(संस्था) समाजकार्य आनंदमयी पुरस्कार २००७
आमिर खान चित्रपट विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००८
उल्हास प्रतिष्ठान(संस्था) समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २००८
कुमार बोस संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
गणपतराव पाटील शेतीक्षेत्र विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१३
उस्ताद गुलाम मुस्तफा संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
कवी ग्रेस साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार वर्ष?
चारुदत्त आफळे समाजसेवा आनंदमयीपुरस्कार २००३
जया बच्च्चन चित्रपटक्षेत्र आदिशक्ती पुरस्कार २०१३
धर्मेंद्र चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
नीतिन वीरखरे समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०११
नीला श्रॉफ यांचे वात्सल्य फाउंडेशन समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०१३
डॉ. प्रसाद देवधर समाजसेवा आनंदमयी पुरस्कार २०१२
प्रसाद सावकार नाट्य आणि संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०११
भालचंद्र पेंढारकर नाट्य मोहन वाघ पुरस्कार २००७
भैरप्पा साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०१२
म.वा. धोंड साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २००५
महेश एलकुंचवार साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०११
माधुरी दीक्षित नेने चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
मालिनी राजूरकर संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००८
रत्नाकर मतकरी साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २०१३
राम शेवाळकर साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार १९९९
रेखा चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००५
वंदना गुप्ते नाट्य आणि चित्रपट दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार २०१३
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान(संस्था) संगीत आणि नाट्य मोहन वाघ पुरस्कार २०१२
विक्रम गोखले नाट्य आणि चित्रपट विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१२
विजया मेहता नाट्य मोहन वाघ पुरस्कार २००५
शंभूराजे(नाटक-निर्माते मोहन तोंडवळकर) नाट्यनिर्मिती दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००८
शम्मी कपूर चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
शरद अभ्यंकर साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २००८
श्रीराम लागू नाट्यक्षेत्र मोहन वाघ पुरस्कार २००८
सरोजिनी वैद्य साहित्य वाग्विलासिनी पुरस्कार २००७
पंडित सी.आर. व्यास संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार १९९९
उस्ताद सुलतान खान संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
सुधीर मोघे कवितालेखन पुरस्काराचे नाव? २००७
सुनील बर्वे नाट्यसेवा मोहन वाघ पुरस्कार २०१३
सुरेश वाडकर संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१३
उस्ताद सुलतान खान संगीत दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
सोनपंखी(नाटक) नाट्यलेखन दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
हेमा मालिनी चित्रपट दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २००७
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
प्रभा अत्रे संगीत दीनानाथ मंगेशकर २००५
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष
पुरस्कारप्राप्त व्यक्ती क्षेत्र पुरस्काराचे नाव वर्ष

(अपूर्ण)

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.