गंगाधर गाडगीळ
| गंगाधर गाडगीळ | |
| पूर्ण नाव | गंगाधर गोपाळ गाडगीळ |
| जन्म | ऑगस्ट २५, १९२३ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू | १५ सप्टेंबर, इ.स. २००८ (वय ८५) मुंबई, महाराष्ट्र, भारत |
| कार्यक्षेत्र | अध्यापन (अर्थशास्त्र) साहित्य |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | मराठी |
| साहित्यप्रकार | कथा, ललित, समीक्षा |
| प्रसिद्ध साहित्यकृती | दुर्दम्य |
| पुरस्कार | जनस्थान पुरस्कार |
| वडील | गोपाळ |
| पत्नी | वासंती |
गंगाधर गाडगीळ (जन्म:ऑगस्ट २५, १९२३ - मृत्यू:सप्टेंबर १५, २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ, समीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते.
अनुक्रमणिका |
[संपादन] शिक्षण
मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्यूकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले.
[संपादन] कारकीर्द
एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी मुंबईच्या रुपारेल कॉलेजातून गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापक पेशाला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. १९६४ ते १९७१ या काळात ते मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड इकॉनॉमिक्सचे प्राचार्य होते. १९७१ ते १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमुहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली.
[संपादन] साहित्यिक कारकीर्द
लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर पुढे 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९४६ साली प्रकाशित झाला.
यानंतर ठरावीक कालाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड ( १९४८), नव्या वाटा (१९५०), भिरभिरे (१९५०), संसार ( १९५१), उध्वस्त विश्व (१९५१), कबुतरे (१९५२), खरं सांगायचं म्हणजे (१९५४), तलावतले चांदणे (१९५४), वर्षा(१९५६), ओले उन्ह(१९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणार्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले.
[संपादन] भूषवलेली पदे
१९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उदघाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते.
'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसर्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता.
[संपादन] साहित्य
गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे-
[संपादन] कथासंग्रह
- कडू आणि गोड (१९४८)
- नव्या वाटा (१९५०)
- भिरभिरे (१९५०)
- संसार (१९५१)
- उध्वस्त विश्व (१९५१)
- कबुतरे (१९५२)
- खरं सांगायचं म्हणजे (१९५४)
- तलावातले चांदणे (१९५४)
- वर्षा (१९५६)
- ओले उन्ह (१९५७)
- काजवा (?)
- बंडू (?)
- पाळणा (?)
[संपादन] कादंबर्या
[संपादन] प्रवासवर्णने
- गोपुरांच्या प्रदेशात (१९५२)
- साता समुद्रापलिकडे (१९७९)
- चीन एक अपूर्व अनुभव (१९९३)
- नायगाराचं नादब्रह्म (१९९४)
- हिममय अलास्का
[संपादन] नाटके
[संपादन] समीक्षा ग्रंथ
[संपादन] आत्मचरित्र
- मुंबई आणि मुंबईकर
- एका मुंगीचे महाभारत
- भोपळा
- बायको आणि डोंबलं
- भरारी
- सफर बहुरंगी रसिकतेची
- पाच नाटिका
- अशा चतुर बायका
- आम्ही आपले धडधोपट
- सात मजले हास्याचे
- बंडू बिलंदर ठरतो
- बुगडी माझी सांडली ग
- बंडू-नानू आणि गुलाबी हत्ती
- स्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते
- बंडू
- जगू आणि खतरनाक अब्दुल्ला
- पाण्यावरची अक्षरे
- बाबांचं कलिंगड आणि मुलीचा स्वेटर
- एकेकीची कथा
- काजवा
- साहित्याचे मानदंड
- बंडू नाटक करतो
- बंडू मोकाट सुटतो
- हसर्या कथा गंगाधर गाडगीळांच्या
- निवडक फिरक्या
- मुंबईच्या नवलकथा
- लंब्याचवड्या गोष्टी
- बंडूचे गुपचुप
[संपादन] गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, रायपूर, १९८१
[संपादन] पुरस्कार
- १९९६ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'एका मुंगीचे महाभारत'
- जनस्थान पुरस्कार