किशोर शांताबाई काळे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डॉ. किशोर शांताबाई काळे:
भटक्या तमासगीर "कोल्हाटी" समाजात जन्माला आलेल्या, व बाप कोण हे माहिती नसल्याने आई चे नांव लावणाऱ्या डॉ. किशोर काळे ह्यांचे अत्यंत गाजलेले कोल्हाट्याचे पोर हे आत्मचरित्र ग्रंथाली ने प्रकाशित केले होते. त्याचे English भषांतर "पेन्ग्वीन पब्लिकेशन्स्" ने प्रकाशित केले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी MBBS पदवी १९९४ साली मिळवली होती.
पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर डॉ. काळ्यांना त्यांच्या समाजाकडून बहिष्कृत करण्यात आले होते.
डॉ. काळ्यांचे दुसरे पुस्तक मी डॉक्टर झालो हे "आपलं प्रकाशन" ने प्रकाशित केले आहे.
२१ फेब. २००७ ला डॉ. किशोर काळ्यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.
बाह्य दुवे[संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |