बासरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सात छिद्रे असलेली आडवी बासरी.

बासरी हे वेळुपासुन बनलेले एक फुंकून वाजविण्याचे वाद्य आहे . हे श्रीकृष्णाचे आवडते वाद्य होते.भारतात हे वाद्य फार पुरातन काळापासून प्रचलीत आहे. बासरीची लांबी 12" ते जवळजवळ 40" असते.

रचना[संपादन]

बासरी हे एक सुषिर वाद्य आहे. हे भारतीय संगीतातील वाद्यांमधील आद्य वाद्य मानले जाते. भुंग्यांनी भोक पाडलेल्या बांबुमधून वारा जाताना आलेल्या आवाजामुळे या वाद्याची कल्पना सुचल्याचे मानले जाते. सामान्यतः, बासरी ही बांबूपासून बनवली जाते. एका टोकाला बांबू कॄत्रिम बुचाने बंद केला जातो, अथवा बांबूच्या पेराच्या सांध्याचाच वापर करून ते टोक बंद राखले जाते. बासरीला हाताच्या बोटांनी घडी ठेवून स्वर काढण्यासाठीची ६/७/८ छिद्रे (स्वररंध्रे) असतात, आणि एक फुंकरीचे छिद्र (मुखरंध्र) असते हे बंद टोकाजवळ असते. त्याखाली सामान्यतः म, ग, रे, सा, नी, ध आणि प या स्वरांची स्वररंध्रे असतात. काही वेळा 'प'च्या स्वररंध्राखाली 'म'चे स्वररंध्र बनवले जाते. बासरीवादक श्री केशवराव गिंडे यांनी केलेल्या नव्या संरचनेमध्ये मुखरंध्राकडील मच्या स्वररंध्राच्या वर पचे एक स्वररंध्र बनवलजाते.

वादन[संपादन]

हिदुस्तानी संगीत 3 सप्तकांमधे वाजवले जाते- मंद्र(खालची पट्टी), मध्य(मधली पट्टी), तार(वरची पट्टी). बासरीच्या मुखरंध्रावर फुंकर घालून आणि दोन्ही हातांची तीन तीन बोटे (तर्जनी,मध्यमा आणि अनामिका) स्वररंध्रांवर ठेवून आणि पूर्ण अथवा अर्धी उचलून स्वरनिर्मिती केली जाते. बासरीमधून सामान्यतः दोन सप्तकांत (मंद्र पंचम ते मध्य षड्ज हे अर्धे सप्तक्, मध्य षड्ज ते तार षड्ज हे पूर्ण सप्तक, तार षड्ज ते तार पंचम हे अर्धे सप्तक) वादन करता येते (प्रगत वादक तार पंचम ते अतितार षड्ज असे अर्धे सप्तक अधिक वाजवू शकतो). बासरीत एकूण 15 सूर वाजवता येतात, ते खालीलप्रमाणे :

'प 'ध 'नी सा रे नी सा' रे' ग' म' प'
सर्व mdbस्वरछिद्रे बंद केवळ सहावे स्वरछिद्र उघडे पाचवे व सहावे स्वरछिद्रे उघडी वरची तीन स्वरछिद्रे बंद वरची दोन स्वरछिद्रे बंद पहिले स्वरछिद्र बंद सर्व स्वरछिद्रे उघडी केवळ पहिले स्वरछिद्र उघडे केवळ सहावे स्वरछिद्र उघडे पाचवे व सहावे स्वरछिद्रे उघडी वरची तीन स्वरछिद्रे बंद वरची दोन स्वरछिद्रे बंद पहिले स्वरछिद्र बंद सर्व स्वरछिद्रे उघडी केवळ पहिले स्वरछिद्र उघडे
सौम्य फुंकर सौम्य फुंकर सौम्य फुंकर सौम्य फुंकर सौम्य फुंकर सौम्य फुंकर सौम्य फुंकर साधारण फुंकर साधारण फुंकर तीव्र फुंकर तीव्र फुंकर तीव्र फुंकर तीव्र फुंकर तीव्र फुंकर अतितीव्र फुंकर

ध्रांच्या सामान्य बासरीच्या वादनामध्ये स्वर खालील पद्धतीने काढले जातात. मुखरंध्राकडील पहिले स्वररंध्र (मचे स्वररंध्र) डाव्या हाताच्या तर्जनीने झाकले जाते. त्या खालील स्वररंध्रे अनुक्रमे डाव्या हाताची मध्यमा, अनामिका, उजव्या हाताची तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या बोटांनी झाकली जातात. (हे वर्णन आणि खालील स्थिती डावा हात मुखरंध्राजवळ आणि उजवा हात खाली अश्या प्रकारे वाजवतानाच्या स्थितीचे आहे. अश्या वेळी बासरी ही वादकाच्या उजव्या बाजूला असते. हात उलट घेऊन्, डाव्या बाजूला बासरी धरून वादन करताना खालील वर्णनामध्ये डावा आणि उजवा हे शब्द उलट होतील, बोटे तीच राहतील. )

स्वर वापरले जाणारे बोट
सर्व स्वररंध्रे बंद.
कोमल ध उजव्या हाताची अनामिका अर्धी उचललेली.
शुद्ध ध उजव्या हाताची अनामिका उचललेली.
कोमलनी उजव्या हाताची अनामिका उचललेली आणि मध्यमा अर्धी उचललेली.
शुद्धनी उजव्या हाताची अनामिका आणि मध्यमा उचललेली.
सा उजव्या हाताची सर्व बोटे उचललेली.
कोमल रे उजव्या हाताची सर्व बोटे उचललेली
आणि डाव्या हाताची तर्जनी अर्धी उचललेली.
शुद्ध रे उजव्या हाताची सर्व बोटे
आणि डाव्या हाताची तर्जनी उचललेली.
कोमल ग उजव्या हाताची सर्व बोटे
आणि डाव्या हाताची तर्जनी उचललेली, डाव्या हाताची मध्यमा अर्धी उचललेली.
शुद्ध ग उजव्या हाताची सर्व बोटे
आणि डाव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा उचललेली.
शुद्ध म उजव्या हाताची सर्व बोटे आणि
डाव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा पूर्ण उचललेली, आणि डाव्या हाताची अनामिका अर्धी उचललेली.
तीव्र म दोन्ही हातांची सर्व बोटे उचललेली.

सप्तक बदलण्यासाठी फुंकरीच्या जोरामध्ये बदल केला जातो, बोटे तशीच राहतात. मात्र तार पंचम ते अतितार षड्ज या स्वरांकरता बोटांची स्थिती वेगळी असते.

==प्रकार==royal Cheap

उभी बासरी[संपादन]

आडवी बासरी[संपादन]

प्रसिद्ध बासरी वादक[संपादन]

हिंदुस्तानी बासरी[संपादन]

बासरी हे वाद्य सुशीर वाद्य आहे .या वाद्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.तसेच बासरी ही बांबू ,पितळ,अक्रालिक या पदार्थांपासून बनवली जाऊ शकते हे वाद्य जबराट असते.