Jump to content

विहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बौद्ध विहार या पानावरून पुनर्निर्देशित)
बोरोबदूर — जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार, इंडोनेशिया

विहार हे बौद्ध धर्मीयांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच बौद्ध मंदिर आहे. विहारात बौद्ध भिक्खु-भिक्खुणी निवास करतात. पाली भाषेत विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिक्खु वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध विहारास बौद्ध मठ सुद्धा म्हटले जाते.

बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. बौद्ध विहार हे बौद्ध धम्मीय शिक्षणाचे केंद्र असते

Plan of cave 1 at Ajanta, a typical vihara hall for prayer and living, 5th century

श्रीलंका, चीन, थायलंड, तिबेट तसेच भारतातील सारनाथ , बुद्धगया येथील विहार प्रसिद्ध आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत