Jump to content

नाशिक विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाशिक विभाग नकाशा

नाशिक विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.ह विभाग खान्देश म्हणून देखील ओळखला जातो.या विभागामध्ये नाशिक हे सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते. या प्रदेशातील नाशिक हे शहर लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठे शहर असून हेच शहर विस्तार व साक्षरतेबाबत प्रशासकीय विभागात अग्रेसर आहे .

चतुःसीमा

[संपादन]

या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग आणि गुजरात राज्य, पूर्वेस अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) आणि औरंगाबाद विभाग(मराठवाडा), उत्तरेस मध्य प्रदेश राज्य व दक्षिणेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र) आहेत.

थोडक्यात माहिती

[संपादन]
  • क्षेत्रफळ - ५७,४९३ किमी²
  • लोकसंख्या (२००१ची गणना) - १,५७,७४,०६४

तालुके:: ५४

-या विभागातील जळगाव जिल्हा तुषार सिंचनासाठी राज्यात अग्रेसर आहे. -अहमदनगर जिल्हा हा सर्वाधिक विहिरी व सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा आहे.