Jump to content

नाचणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नागली या पानावरून पुनर्निर्देशित)

नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा एक भरड धान्याचा प्रकार आहे. कोकण आणि डांग[](गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो.

नाचणीचे झाड
नाचणीचे विविध रंगाचे दाणे

नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा व बिहार या राज्यांमध्येही नाचणी पिकविली जाते. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीच्या गडद विटकरी रंगामुळेच नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांना आकर्षक रंग येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा नाचणीचा आहारात समावेश केला जात नाही. नाचणीचा रंग जरी गडद तपकीरी असला तरी चव मात्र उग्र नसते त्यामुळेच गहु, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात, तसेच पारंपारिक पदार्थांचे पोषण मुल्य वृद्धिंगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो.

संदर्भ

[संपादन]