ग्रंथ लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रंथ लिपी(तमिळ: கிரந்த ௭ழுத்து, मल्याळम: ഗ്രന്ഥലിപി, संस्कृत: "ग्रन्थ" म्हणजे पुस्तक किंवा लेखसंग्रह) ही एक दक्षिण भारतीय लिपी आहे. विशेषतः तामिळनाडू आणि केरळमध्ये वापरली जाते. ही तमिळ ब्राह्मी लिपीपासून इ.स. ५व्या ते ६व्या शतकाच्या दरम्यान उद्भवली. ग्रंथ लिपीचा उपयोग प्रारंभिकपणे संस्कृत मजकूर, तांब्याच्या प्लेटवर आणि हिंदू मंदिरे व मठांच्या दगडांवर शिलालेख लिहीण्यासाठी होत होता. संस्कृत आणि तमिळ यांचे मिश्रण असलेली भाषा मणिप्रवलम् साठी ही लिपि वापरली जात होती. सुमारे ८व्या शतकाच्या मधल्या आणि संक्रमणकालीन ग्रंथची लिपी विकसित झाली जी साधारण १४ व्या शतकापर्यंत प्रचलित होती. संस्कृत आणि द्रविड भाषांमध्ये शास्त्रीय ग्रंथ लिहिण्यासाठी आधुनिक युगात १४ व्या शतकापासून अधिक विकसित झालेली आधुनिक ग्रंथ लिपी आणि तुळु-मल्याळम लिपी वापरली जात आहे. ही भजन आणि परंपरागत वैदिक शाळांमध्ये जप करण्यासाठी देखील वापरले जाते.

पल्लव लिपीच्या उत्पत्तीद्वारे, ग्रंथ लिपी तमिळ आणि वट्टेलट्टू लिपीशी संबंधित आहे. केरळची आधुनिक मल्याळम लिपी ग्रंथ लिपिची थेट वंशज आहे. आग्नेय आशियाई आणि इंडोनेशियन लिपी जसे की थाई आणि जावानीज, तसेच दक्षिण आशियाई तिगलारी आणि सिंहला लिपीसुद्धा प्रारंभिक पल्लव लिपीद्वारे ग्रंथ लिपीशी संबंधित किंवा जवळून संबंधित आहेत.

ग्रंथ लिपीतील आद्याक्षरे[संपादन]

खालील तक्ता तयार करण्यासाठी e-Grantamil हा टंक INDOLIPI ह्या संकेस्थळावरून घेण्यात आला आहे.

खालील तक्त्यातील ग्रंथ लिपी ही आधुनिक ग्रंथ लिपी आहे. जिचे साम्य आत्ताच्या तमिळ लिपीशी आहे.

स्वर[संपादन]

Grantha Vowels.svg

व्यंजन[संपादन]

Grantha Consonants.svg

As with other Abugida scripts Grantha consonant signs have the inherent vowel /a/. Its absence is marked with Virāma:

Grantha Halant.svg

इतर स्वरांसाठी diacriticचा वापर केला जातो:

Grantha Matras.svg

Sometimes ligatures of consonants with vowel diacritics may be found, e.g.:

Grantha VowelLig.gif

There are also a few special consonant forms with Virāma:

Grantha FinCons.gif

व्यंजन समुह[संपादन]

Grantha has two ways of representing consonant clusters. Sometimes, consonants in a cluster may form ligatures.

Grantha ConsLig.gif

Ligatures are normally preferred whenever they exist. If no ligatures exist, "stacked" forms of consonants are written, just as in Kannada and Telugu, with the lowest member of the stack being the only "live" consonant and the other members all being vowelless. Note that ligatures may be used as members of stacks also.

Grantha SubLig.gif

विशिष्ट प्रकार:

जेव्हा Grantha Ya.svg य आणि Grantha Ra.svg र जोडाक्षरात शेवटी येतात, तेव्हा अनुक्रमे Grantha yvat.svg आणिGrantha rvat.svg प्रकारे दर्शवितात. ह्यांना अन्य भारतीय लिप्यांमध्ये 'य-फला' आणि 'र-वट्टू' असेही बोलतात. Grantha yrLig.gif

जेव्हा Grantha Ra.svg र जोडाक्षरात सुरुवातीला येतो तेव्हा तो Grantha reph.svg(रेफ) ह्याप्रकारे दर्शवितात आणि तो जोडाक्षराच्या शेवटी देतात पण "य-फला"च्या आधी देतात.

Grantha RephLig.gif

ग्रंथ लिपीतील आकडे[संपादन]

Grantha Numbers.svg

नमुना मजकूर[संपादन]

कालिदासाचे कुमारसम्भवम् :

Grantha Kalidasa Kumarasambhavam.svg

देवनागरीत लिप्यांतर :

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः।

पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥

युनिकोड[संपादन]

जून २०१४ मध्ये युनिकोडच्या सातव्या आवृत्तीत ग्रंथ लिपि जोडण्यात आली. ग्रंथ लिपीचा युनीकोडचार्ट पिडीएफ फॉर्मॅट.

हे सुद्धा पहा[संपादन]