शून्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शून्य संकल्पनेचा वापर करून विवीध गणिते करणारा आर्यभट्ट यांचा भारतातला पुतळा.

शून्य (चिन्ह: ०) ही संकल्पना गणितशास्त्रात एक संख्या व स्थान-मूल्य दर्शक म्हणून वापरली जाते. शून्य व त्यावर आधारित दशमान पद्धत ही भारतीयांनी जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यापूर्वी मोठ्या संख्या लिहिणे वा त्यांची गणिते करणे अत्यंत किचकट असे.

इतिहास[संपादन]

शून्याचा सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील शिलालेखात.

उत्तर वैदिक काळात शून्याचे अनेक उल्लेख आहेत. शून्याचा प्रथम उल्लेख हा पिंगललिखित छंद सूत्रात आढळतो. शास्त्रकार पिंगल २०० इ.स.पू. ते २०० इ.स. मध्ये त्याचा काळ आहे. भारतीय गणिती आर्यभट यांनी इ.स. ४५६ च्या आसपास शून्य या संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. शून्याचा शिलालेखांतील सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील शिलालेखात आढळतो. यास स्थानिक लोक महादेव मंदिर असेही म्हणतात. हे देऊळ इ.स. ८७६ मध्ये बांधले गेले असे हा शिलालेख दर्शवतो. म्हणून लिखित पुरावा इ.स. ८७६ पासून अस्तित्वात आहे असे म्हणता येते.

शिलालेख असलेले ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील देऊळ


महाराष्ट्र[संपादन]

सातवाहन आणि क्षत्रपांच्या इ.स. पू. २०० वर्षे जुन्या असलेल्या शिलालेखात कालगणना कोरलेली आढळते. ही गणना १० (+) २, ४० (+) ४ म्हणजेच १२, ४४ अशा रूपांत आढळते. या लेखात शून्य हा आकडा सध्याच्या देवनागरीतील वर्तुळासारखा नसून ब्राह्मी लिपीत लिहिलेला दिसून येतो.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]