Jump to content

२ (संख्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दोन या पानावरून पुनर्निर्देशित)

  २ - दोन   ही एक संख्या आहे, ती १  नंतरची आणि  ३  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:  2 - two .

→ २ →
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
दोन
१,२
II
٢
ग्रीक उपसर्ग
di 
१०
ऑक्टल

हेक्साडेसिमल
१६
१.४१४२१३५६२

गुणधर्म

[संपादन]
संख्येवरील क्रिया
संख्या (x) बेरीज व्यस्त (−x) गुणाकार व्यस्त (१/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x) घनमूळ (√x) घन (x) क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-२  ०.५ १.४१४२१३५६२३७३१ १.२५९६२९९७९९४७४

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

[संपादन]

भारतीय संस्कृतीत

  • द्वितीया दुसरी तिथी
  • दोन आद्य शाहीर- लव आणि कुश
  • दोन अयने- उत्तरायण, दक्षिणायन
  • दोन उपासना पद्धति- सगुण, निर्गुण
  • दोन गोलार्ध- उत्तर, दक्षिण; तसेच पूर्व, पश्चिम
  • दोन चैतन्ये- जीवचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य
  • दोन जगे- ऐहिक आणि पारमार्थिक
  • दोन मार्ग- प्रवृत्ति मार्ग, निवृत्ति मार्ग
  • दोन पक्ष- शुक्लपक्ष, कृष्णपक्ष
  • दोन प्रकारचा विनोद- शब्दनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ
  • दोन प्रयत्‍न(व्याकरणशास्त्र)- आभ्यंतर, बाह्य
  • दोन भारतीय महाकवी- व्यास आणि वाल्मीकी
  • क्रमांक दोन हे द्वैत स्थितीचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे जे आपण आपल्या मन आणि इंद्रियांद्वारे वस्तुनिष्ठपणे अनुभवतो. हे पुरुष आणि प्रकृती (देव आणि निसर्ग), ब्राह्मण आणि आत्मा हे दोन स्वतंत्र अस्तित्त्व, जाणता आणि ज्ञात, विषय आणि वस्तू, कर्ता आणि कर्म, स्वतः आणि नसलेले, भूतात्मन (अहंकार किंवा भौतिक आत्म) आणि अंतरात्मन (वास्तविक स्व), शिव आणि शक्ती, विष्णू आणि लक्ष्मी, ब्रह्मा आणि सरस्वती, पृथ्वी आणि आकाश, कारण आणि परिणाम, दिवस आणि रात्र, स्वर्ग आणि नरक, चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, ज्ञान आणि अज्ञान, उच्च ज्ञान आणि कमी ज्ञान, जीवन आणि मृत्यू, भ्रम आणि प्रकाश आणि मृत्यु आणि अमरत्व.

हे सुद्धा पहा

[संपादन]