भगवंत मान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भगवंत मान

विद्यमान
पदग्रहण
१६ मार्च २०२२
मागील चरणजीत सिंह छन्नी

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१६ मे २०१४ – १४ मार्च २०२२
मागील विजय इंदर सिंगला
मतदारसंघ संगरूर

जन्म १७ ऑक्टोबर, १९७३ (1973-10-17) (वय: ५०)
संगरूर, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष आम आदमी पार्टी

भगवंत मान (जन्म: १७ ऑक्टोबर १९७३) हे भारत देशाच्या पंजाब राज्यामधील एक राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व पंजाब राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०२२ पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये मान ह्यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर १६ मार्च २०२२ रोजी मान ह्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ह्यापूर्वी मान २०१४ व २०१९ साली पंजाबच्या संगरूर मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले होते.

आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्या आधी मान अभिनय क्षेत्रामध्ये होते.

संदर्भ[संपादन]