तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनात तहसीलदार हा प्रमुख असतो तो तालुक्यांतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासनाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.