नवाझ शरीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नवाझ शरीफ (इ.स. १९९८)

मियां मोहम्मद नवाझ शरीफ (पंजाबी, उर्दू: میاں محمد نواز شریف ; रोमन लिपी: Mian Mohammad Nawaz Sharif;) (डिसेंबर २५, इ.स. १९४९; लाहोर, पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी, उद्योजक व पाकिस्तानाचा माजी पंतप्रधान आहे. नोव्हेंबर १, इ.स. १९९० ते जुलै १८, इ.स. १९९३ या कालखंडात पहिल्यांदा व त्यानंतर फेब्रुवारी १७, इ.स. १९९७ ते ऑक्टोबर १२, इ.स. १९९९ या कालखंडात दुसऱ्यांदा, अश्या दोन वेळा त्याने पाकिस्तानाचे पंतप्रधानपद सांभाळले. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) हा त्याचा राजकीय पक्ष आहे. इ.स. १९९८ साली भारताने केलेल्या अण्वस्त्रचाचण्यांच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानाच्या अण्वस्त्रचाचण्या करण्याचे आदेश देणारा पाकिस्तानाचा नेता अशी त्याची वैशिष्ट्यपूर्ण आंतरराष्ट्रीय ओळख आहे.

बाह्य दुवे[संपादन]