Jump to content

ब्रह्मवैवर्त पुराण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रह्मवैवर्त पुराण हे १८ महापुराणांपैकी नववे महापुराण असून त्यात ब्रह्म आणि सृष्टीच्या परिवर्तनाचा विस्तृत वेध घेतला आहे.[१] या पुराणात भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या लीलांचे, तसेच त्यांच्या गोलोकधामाचे अत्यंत रमणीय आणि भक्तीपूर्ण वर्णन आढळते.[२] यामध्ये ब्रह्मखंड, प्रकृतिखंड, गणपतीखंड आणि श्रीकृष्णजन्मखंड असे चार मुख्य भाग असून यात विविध सण, व्रत-वैकल्ये आणि धर्माचरणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 मणि, वेट्टम (१९७५). पौराणिक कोष. मोतीलाल बनारसीदास. ISBN 978-8120804173.
  2. ↑ दांडेकर, रा. ना. (१९७८). पौराणिक साहित्य आणि संस्कृती. काँटिनेंटल प्रकाशन.