Jump to content

भविष्य पुराण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


सुमारे १५००० श्लोकांच्या या पुराणात भविष्यकालीन घटना व व्यक्ती यांचा निर्देश असल्याने यास महत्त्व आपोआप आले आहे. सृष्टीची उत्पत्ती, ब्रम्हान्डाचे वर्णन, वर्णाश्रमधर्म, गृहस्थधर्म, पतिव्रताधर्म, च्यवनसुकन्याकथा, गणेशचतुर्थी व्रत, नागपंचमीव्रत, इत्यादी विषयाबरोबरच हे पुराण सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व देते असे दिसून येते. सूर्यमंदिरे, सौरतीर्थे , सूर्याची उपासना, सांबाने केलेली सूर्याची आराधना, अशा विषयांनी या पुराणाने सूर्याचा महिमा प्रस्थापित केला आहे. भूलोकविस्तार, पाताळवर्णन, यज्ञाची प्रक्रिया, यज्ञमहिमा, देव, देवालये, मूर्ती, वृक्षमाहात्म्य , मनू, राजवंश इत्यादींचे वर्णन करता करता तैमुरलंग, पाणिनी, शंकराचार्य, भट्टोजी दिक्षित, नरसी मेहेता इत्यादींच्या कथा सांगितल्या आहेत. तसेच येशू ख्रिस्त (ईसा मसी) आणि मुहमद पैगंबर (महामद) यांचाही उल्लेख आला आहे. या पुराणात इंग्रज हे गुरुंड या नावाने येतात व सनडे, फेब्रुवारी, सिक्स्टी असे इंग्रजी शब्द या पुराणात असून राणी विक्टोरिया हिस विकटावती असे नाव दिले आहे. अर्थातच काळाच्या गतीबरोबर या पुराणात वारंवार भर पडून हा इतिहास समकालीन लेखकांनी या पुराणात "भविष्य" म्हणून मांडला आहे. कालपरत्वे हे पुराण वाढविले आहे हे स्पष्ट होते. तरी अनेक महत्त्वाच्या इतर विषयांसाठी हे पुराण महत्त्वाचे आहे.

संदर्भग्रंथ : वेद पुराणे : समालोचन (लेखक : स. कृ. देवधर, डॉक्टर प्र. न. जोशी)