सप्त चिरंजीव
(सप्तचिरंजीव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील सात पौराणिक व्यक्ती चिरंजीव मानल्या गेल्या आहेत. यांनाच सप्तचिरंजीव असे म्हटले जाते.
प्रातःस्मरणाचा एक श्लोक[संपादन]
या श्लोकात सप्तचिरंजीवांची नावे आली आहेत.
“ | अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः। कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥ |
” |
अर्थ: अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सप्तचिरंजीव आहेत.
मार्कंडेय[संपादन]
काही प्राचीन ग्रंथांत मार्कंडेय ऋषी हे दीर्घायुषी असल्याचे म्हटले आहे, मात्र चिरंजीव म्हणजे अमर नसल्याने त्याचे नाव वरील श्लोकात नाही.
त्यांच्यासाठी एक वेगळा श्लोक आहे.
- अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
- कृपः परशुरमश्च सप्तैते चिरंजीविनः॥
- सप्तैतान् स्मरेन्नित्यम् मार्कंडेयमथाष्टमम्।
- जीवेद्वर्षशतं सोऽपि सर्वव्याधिविवर्जितः॥
पहा : अष्टचिरंजीव