"आषाढी वारी (पंढरपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ३१५: | ओळ ३१५: | ||
* [[कीर्तनकार]] |
* [[कीर्तनकार]] |
||
* [[प्रवचनकार]] |
* [[प्रवचनकार]] |
||
==वारी या विषयावरील पुस्तके== |
|||
* आषाढी (डॉ. रामचंद्र देखणे) |
|||
* एकदा तरी पायी अनुभवावी पंढरीची वारी (डॉ. सुरेश जोशी) |
|||
* पंढरीची वारी (डॉ. वसुधा भिडे) |
|||
* वारकरी पंथाचा इतिहास (शं. वा. दांडेकर) |
|||
* वारी एक आनंदयात्रा (संदेश भंडारे) |
|||
* वारी एक आनंद सोहळा (दीपक नीलकंठ बिचे) |
|||
* वारी : स्वरूप आणि परंपरा (डॉ. रामचंद्र देखणे) |
|||
* विठाई (सकाळ प्रकाशन) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१५:१९, ९ जुलै २०१८ ची आवृत्ती
वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो.[१] [२]
वारी म्हणजे काय?
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. [१]वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. [३] [४]ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. [५] संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.[६] वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.
माळकरी/वारकरी
वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.[१] आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.
'स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा.नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे.
सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.[७]
- वारकरी महावाक्य-
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते.
वारीचा इतिहास
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. [८] संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे." [७] ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल-
- ज्ञानदेवपूर्व काळ-भक्त पुंडलिकाचा काळ
- ज्ञानदेव-नामदेव काळ
- भानुदास-एकनाथांचा काळ
- तुकोबा-निळोबा यांचा काळ
- तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ
प्रकार
वारीचे दोन प्रकार आहेत.
- आषाढी वारी - सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात.
- कार्तिकी वारी - संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.
या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.[९]
पालखी सोहळा
हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते . हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक संगणक युगातही वारीची हही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.[१०]
ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.
तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वत: तुकोबा चौदाशे टाळकरी घेवून प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.[९] महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकाराम च्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.[११]
दिंडी योजना
वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे.
वारीचे /पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य
- रिंगण-
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.[५]
- धावा-
धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूर पर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.[५]
आळंदी-पुणे-सासवड-लोणंद -माळशिरस-वाखरी-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.
* आळंदी-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
देहू-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक
देहू-पुणे-लोणीकाळभोर,यवत,वरवंड, बारामती,इंदापूर,अकलूज,वाखरी,पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.
* देहू-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
वारी/पालखी सोहळा दरम्यानचे विविध कार्यक्रम
वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात.फड म्हणजे वारीप्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वत:ची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात. श्री नामदेव महाराजांचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी, भजनाच्या, कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत.[१४]
शासकीय महापूजा
आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. [१५] [१६]त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते.
साहित्यातील चित्रण
- पुस्तके
देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे. वारीला जाणाऱ्या वारकऱ्याना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्त करून देतात. वारीहून परतताना मात्र वारकऱ्याना अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. या परतीच्या प्रवासावर सुधीर महाबळ यांनी ‘परतवारी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. (प्रकाशन दिनांक ५-३-२०१७)
- चित्रपट
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
वारकऱ्यांच्या संस्था आणि संघटना
- आम्ही वारकरी
- वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य
- अखिल भारतीय वारकरी मंडळ
- कर्नाटक वारकरी संस्था
- कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
- जागतिक वारकरी शिखर परिषद
- तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
- दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
- देहू गाथा मंदिर (संस्था)
- फडकरी-दिंडीकरी संघ
- राष्ट्रीय वारकरी सेना
- वारकरी प्रबोधन महासमिती
- वारकरी महामंडळ
- ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज
- ज्ञानेश्वर महाराज संस्थान
- वारकरी सेवा संघ
समाजाच्या विविध क्षेत्रात वारी
- शाळा :- वारीच्या परंपरेची माहिती मुलांना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी बालगटाच्या शाळा ते माध्यमिक शाळा यांमध्ये आषाढी एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकरी पोशाख घालून येतात आणि पालखी सजवून त्यात विठ्ठल-रखुमाई यांची पूजा करून पालखी सोहळा साजरा करतात. शहरातील निवडक माध्यमिक शाळांतील मुले प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होतात आणि वारकरी भक्तांशी संवाद साधतात, ठरावीक अंतर पायी चालून वारीचा अनुभव घेतात.[१७]
- सायकल वारी- वारीतील विविध सुविधांची पाहणी करण्यासाठी २००० युवक सायकल वारी करतील अशी योजना २०१७ साली करण्यात आली.[१८]
- स्वछता अभियान :- वारीतील गर्दीमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी वारीनंतर पंढरपुरात, तसेच वारीमार्गावर स्वच्छता अभियान केले जाते.[१९]
वारकरी कीर्तनकारांची यादी
* उल्लेखनीय वारकरी कीर्तनकार
|
---|
१. बाबामहाराज सातारकर |
प्रमुख मठ
वारकरी संतांनी मठांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्रे उभारून वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे व आजही करीत आहेत. महाराष्ट्रातील असे काही प्रमुख मठ व त्यांची देवस्थान संस्थाने पुढीलप्रमाणे.
*उल्लेखनीय मठ
|
---|
संत गाडगे महाराज संप्रदायाचे मठ
इतर मठ
|
चित्रदालन
-
संत ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र
-
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी, आळंदी
-
संत तुकाराम महाराजांचे चित्र
-
संत तुकाराम महाराजांचे मंदिर, देहू
-
वारी चालली...
-
हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा व पताका घेतलेला वारकरी.
-
भजन गाणा-या वारकरी महिला
-
चंद्रभागा नदीच्या तीरावरील स्नान
-
वारीचा आनंद घेणारी मुलगी तिच्या आईसह
-
पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी भजन गाताना
-
पंढरपूर येथील देवळाबाहेर असलेली दुकाने
-
संत तुकाराम महाराज पालखी
-
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
-
वारी
-
दिंडी (पुणे शहरात येताना )
-
वारीतील सेवा
-
पालखीचे स्वागत
-
पुणे शहरात वारकरी येताना
वारीसदृश इतर परंपरा
हे सुद्धा पहा
वारी या विषयावरील पुस्तके
- आषाढी (डॉ. रामचंद्र देखणे)
- एकदा तरी पायी अनुभवावी पंढरीची वारी (डॉ. सुरेश जोशी)
- पंढरीची वारी (डॉ. वसुधा भिडे)
- वारकरी पंथाचा इतिहास (शं. वा. दांडेकर)
- वारी एक आनंदयात्रा (संदेश भंडारे)
- वारी एक आनंद सोहळा (दीपक नीलकंठ बिचे)
- वारी : स्वरूप आणि परंपरा (डॉ. रामचंद्र देखणे)
- विठाई (सकाळ प्रकाशन)
संदर्भ
- ^ a b c Mokashi, Digambar Balkrishna (1987). Palkhi: An Indian Pilgrimage (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780887064616.
- ^ The National Geographical Journal of India (इंग्रजी भाषेत). National Geographical Society of India. 1999.
- ^ Phadnis, Deepak (2017-11-29). Pandharpur Wari - A Walking Pilgrimage to Pandharpur (इंग्रजी भाषेत). Deepak Phadnis.
- ^ Agnihotri, D. H. (1977). Maharashtra saskrtice tattvika adhishthana. Suvichar Prakasana Mandal.
- ^ a b c Bansal, Sunita Pant (2012-04-01). Hindu Pilgrimage: A journey through the holy places of hindus all over India (इंग्रजी भाषेत). V&S Publishers. ISBN 9789350572511.
- ^ Ltd, Data and Expo India Pvt; Goyal, Ashutosh (2015-04-01). RBS Visitors Guide INDIA - Maharashtra: Maharashtra Travel Guide (इंग्रजी भाषेत). Data and Expo India Pvt. Ltd. ISBN 9789380844831.
- ^ a b नेरकर अरविंद,होय होय वारकरी (१९९८) ग्रंथाली प्रकाशन
- ^ A complete Collection of the Poems of Tukáráma, (the Poet of the Maháráshṭra.) edited by Vishṇu Parashurám Shástrí Panḍit: In 2 vols. I (हिंदी भाषेत). "Indu-Prakásh" Press. 1869.
- ^ a b नेरकर, अरविंद. होय होय वारकरी (ग्रंथाली प्रकाशन, १९९८).
- ^ लोकमत न्यूज नेटवर्क (२/६/२०१८). "विठू माझा लेकुरवाळा,सांगे विक्रमी भक्ती ममेळा".
- ^ 101 pilgrimages (इंग्रजी भाषेत). Outlook India Pub. 2006.
- ^ दैनिक महाराष्ट्र टाइम्स,बुधवार ७ जून २०१७
- ^ दैनिक महाराष्ट्र टाइम्स, बुधवार ७ जून
- ^ नेरकर अरविंद-होय होय वारकरी (१९९८) ग्रंथाली प्रकाशन
- ^ "बा विठ्ठला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे (१५ जुलै २०१६)".
- ^ Assembly, Maharashtra (India) Legislature Legislative (1980). Debates; Official Report.
- ^ देशपांडे विराज. "Little Ones celebrate ashadi ekadashi with bal Dindi (इंग्रजी) (५..७. २०१७)".
- ^ माळी गुरुबळ. "दोन हजार तरुणांची यंदा आषाढी सायकल वारी (७.६.२०१७)".
- ^ लोकसत्ता टीम. "पंढरपूरमध्ये महास्वच्छता अभियानात ६० टन कचरा गोळा (१२. ७. २०१७ )".
बाह्य दुवे
- वारकरी संप्रदाय
- संत तुकाराम
- संत सोपानदेव
- वारकरी सर्वजनवादच!
- वारकरी संप्रदायाची आधुनिक काळातील मांडणी-चर्चाविश्वांची चिकित्सा
- वारकरी संप्रदाय युवा मंच
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |