Jump to content

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाबामहाराज सातारकर या पानावरून पुनर्निर्देशित)
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे
जन्म नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे
फेब्रुवारी ५, इ.स. १९३६
मृत्यू २६ ऑक्टोबर, २०२३ (वय ८७)
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व मराठी
नागरिकत्व भारतीय
पेशा कीर्तनकार, प्रवचनकार
प्रसिद्ध कामे कीर्तन, प्रवचन
कार्यकाळ १९३६ - २०२३
धर्म हिंदू

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर (५ फेब्रुवारी , १९३६ - २६ ऑक्टोबर, २०२३)[१] हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार होते.

जीवन[संपादन]

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे [२]. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे [३]. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे - नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.

संकीर्ण माहिती[संपादन]

सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड अध्यात्माचा विश्वकोश हरपला". दैनिक लोकमत. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "अधिकृत संकेतस्थळ - व्यक्तिमत्त्व". Archived from the original on 2010-02-06. १३ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.
  3. ^ "श्री बाबा महाराज सातारकर". १३ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]