योगिराज पैठणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(योगिराज महाराज पैठणकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Yogiraj Maharaj Paithankar.jpg

श्री योगिराज महाराज पैठणकर ( Yogiraj Maharaj Paithankar ),(श्रीएकनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र पैठण) हे महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार असून संत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज [१]आहेत. योगिराज महाराजांचे पारमार्थिक शिक्षण सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथे झाले. नाथ साहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास असून भारतातील अनेक राज्यांत कीर्तन, प्रवचन, व्याख्यानादींच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या शांती व समता या तत्त्वांचा प्रसार-प्रचार करीत आहेत.

समाजसेवेसाठी त्यानी "शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन" ची स्थापना केली[२] असून समाजातील गरजूंना मदत व्हावी यासाठी ते कार्यरत आहेत. याशिवाय सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त आळंदी येथे नुकतीच त्यांचेद्वारा "Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून याद्वारे सर्व संतांचे वाङ्मय अभ्यासण्याची सोय झाली आहे . संत एकनाथमहाराजांचे तत्त्वज्ञान फक्त सांगण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी त्याचे आचारणही व्हावे या उद्देशाने एकनाथ षष्ठीच्या दिवशी "वारकरी-वैष्णव पूजनास" सुरुवात केली आहे. [२]

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ [१]
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11467240.cms मटा संकेतस्थळ दि. १९ एप्रिल २०१३ रोजी दुपारी भाप्रवे १३.३६ वाजता जसे तपासले


बाह्य दुवे[संपादन]