अक्षय महाराज भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले ( अक्षय चंद्रकांत भोसले / Akshay Chandrakant Bhosale)

अक्षय महाराज भोसले , बिजवडीकर
मूळ नाव अक्षय चंद्रकांत भोसले
जन्म २६ ऑक्टोंबर
बिजवडी
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय वारकरी संप्रदाय
गुरू प.पू.श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप , प.पू.श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर
भाषा मराठी भाषा
साहित्यरचना मासिक - वैष्णव दर्शन
कार्य कीर्तन,प्रवचन
संबंधित तीर्थक्षेत्रे आळंदी ,पंढरपूर ,गोंदवले
वडील चंद्रकांत गुलाबराव भोसले
आई धनश्री
विशेष माहिती ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवत यांचे अभ्यासक

संपादक : मासिक - वैष्णव दर्शन ( ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र )[१]
संस्थापक / अध्यक्ष : वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र [२] संचालक : महा एनजीओ फेडरेशन
ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी या गावचा . लहानपणीच मातु:श्री धनश्री यांच्याकडून अध्यात्मिक संस्काराचे बाळकडू . शालेय प्राथमिक शिक्षण ज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , पवई येथे तर माध्यमिक शिक्षण अनुक्रमे तेरणा महाविद्यालय , कोपरखैराणेरयत शिक्षण संस्था वाशी गाव येथील विद्यालयात . महाविद्यालयीन शिक्षण हे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय ,खारघर येथे . बालवयात मातु:श्री मुळे ब्रह्मलीन सद्गुरू बेळगावच्या कृष्णभक्त श्री कलावती देवी यांच्या सत्संगाची आवड . नियमित बलोपासना तथा आदि संत वाड्मयाचे वाचन मनन .शालेय शिक्षण घेतानाच देगलूरकर परंपरेचे निष्ठावंत तथा वै.श्रीधुंडामहाराज देगलूरकर यांचे शिष्य श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्या कीर्तनाचा बालमनावर परिणाम . गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण . शास्त्रीय गायन तथा पखवाज वादन यांचे शिक्षण . प.पू.श्रीगुरू ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर, प.पू.श्रीगुरू ह.भ.प. प्रमोदमहाराज जगताप यांचे पारमार्थिक क्षेत्रात प्रमुख मार्गदर्शन .सद्गुरू प.पू. बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तन श्रवणाची आवड .सन २०१४ पासून मासिक वैष्णव दर्शन ( ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र ) याचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत . इंटरनेटच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व त्यातील संतसाहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्नशील . नियमित पणे वारकरी संप्रदाययुवा मंच च्या ब्लॉग द्वारे लिखाण . वारकरी संप्रदाय संदर्भात अनेक मुलाखती . पंढरपूर वारी दरम्यान दूरदर्शन-सह्याद्री [३].ऋषी पंचमी निम्मित दूरदर्शन-सह्याद्री वरील मुलाखत [४]वाहिनीवर अनेक मुलाखती . वारी आणि सोशल मिडिया यांवरील झी २४ तास [५]वरील विशेष मुलाखत . वारकरी संप्रदाय व त्यातील कार्याविषयी लोकमत,प्रहार (वृत्तपत्र)[६],सकाळ (वृत्तपत्र),पुढारी (दैनिक) आदींद्वारा लेख तथा कार्याचा गौरव विवध वृत्त प्रसिद्ध . महाराष्ट्रातील विविध भागात अखंड हरीनाम सप्ताहांचे आयोजन प्रामुख्याने श्रीक्षेत्र गोंदवले खुर्द येथील गोकुळ अष्टमी उत्सव , खारघर- ओवे गाव , बिजवडी माण , मोगराळे , फलटण,म्हसवड,उरळी कांचन येथील रामनवमीउत्सव तथा नाम यज्ञ उत्सव . कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र तथा अन्य राज्यात हि स्त्रीशिक्षण,व्यसनमुक्ती , अंधश्रद्धा[७] निर्मुलनाचे कार्य उत्तुंग कार्य . वारकरी संप्रदाययुवा मंचच्या माध्यमातून उच्च शिक्षित तथा सुसंस्कारिक युवांचे संघटन . मासिक - वैष्णव दर्शन च्या माध्यमातून अनेक विशेष अंकांचे प्रकाशन . सातारा जिल्ह्यातील भव्य आशा असणाऱ्या आई महोत्सव चे जनक . सोशल मिडिया च्या माध्यमातून वारीची माहिती जगभरात पोहचवण्यासाठी अक्षयवारी[८] ची निर्मिती . व्हाट्सअप्प च्या माध्यमातून नियमित हाजरो लोकांना आपल्या स्मार्टफोन वर आपल्या शेकडो सहकाऱ्यांच्या मदतीने संत साहित्यिची माहिती पोहचवणारे व्यक्तिमत्व .

संपादन केलेले विशेष अंक[संपादन]

कार्तिक वारी विशेष अंक , आळंदी
जागतिक महिला दिनानिम्मित स्त्रीसंत विशेष अंक
वै.प.पू.सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर सद्गुरू विशेष अंक
श्री भगवान दत्तात्रय जयंती विशेष अंक
महाशिवरात्री विशेषअंक
श्रीसंत माणकोजीमहाराज बोधले चरित्रपर विशेष अंक
वै.प.पू.सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर सकला पढिये भानु स्मृति ग्रंथ
वै.प.पू.सद्गुरू जगन्नाथमहाराज मोगराळेकर स्मृति ग्रंथ
ह.भ.प.गोविंदबाबा वाहाळकर , नवी मुंबई यांचा सहस्रचंद्रदर्शन - कार्यगौरव ग्रंथ
रजतोत्सव - कल्याण वारकरी सेवा मंडळ
नाथसंकेत - संत नरहरीनाथ संस्थान , देऊळगाव राजा , बुलडाणा

पुरस्कार[संपादन]

 • ज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , पवई तर्फे आदर्श विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार .
 • सन २०१५ चा संत गाडगे बाबा सेवा आश्रम सामाजिक संस्था यांचा वारकरीरत्न पुरस्कार.[९]
 • सन २०१५ श्रीमंत श्रीरघुनाथराजे नाईक निंबाळकर - २०१५ फलटण संस्थान यांच्याकडून विशेष सन्मान .
 • सन २०१६ चा स्वरकुल सामजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र विभूषण पुरस्कार .[१०]
 • सन २०१६ राम नवमी उत्सव उरळीकांचन येथे नागरी विशेष सन्मान .
 • सन २०१६ मा.श्री.प्रभाकर देशमुख (आय.ए.एस.) व मा.श्री.तानाजी सत्रे (आय.ए.एस.)यांच्या हस्ते नवी मुंबई येथे विशेष सन्मान.
 • सन २०१६ श्रीसंत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर जळगाव यांच्यावतीने श्री तुळशी अर्चन सोहळ्यात विशेष सन्मान .
 • सन २०१७ सुदर्शन वाहिनी , दिल्ली यांच्याकडून स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार .
 • सन २०१७ मा.धर्मवीर श्रीआनंद दिघे साहेब यांची स्मृती असणारे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट , ठाणे ( खासदार मा.श्रीराजन विचारे ) यांच्या तर्फे युवा पिढी मध्ये सामाजिक तथा आध्यत्मिक कार्यात भरीव योगदानासत्व भव्य सत्कार व  नवरत्न पुरस्कार मा.राज्यमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते .!
 • सन २०१७ आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यावतीने आध्यत्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या शुभ हस्ते यंग आचिव्हर्स ने गौरव .!
 • सन २०१७ प्रसिद्ध उद्योजक श्रीमोहन म्हात्रे यांच्याहस्ते ओवे -

खारघर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान ..!

 • मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी यांच्यावतीने पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या शुभहस्ते राजर्षी श्रीशाहूमहाराज स्मारक , कोल्हापूर येथे भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्काराने गौरव ...!
 1. ^ fb.com/vaishnavdarshn
 2. ^ varkariyuva.blogspot.in
 3. ^ https://www.youtube.com/watch?v=Cbjpvr3zxak
 4. ^ https://www.youtube.com/watch?v=FgaldxVQlVI
 5. ^ https://www.youtube.com/watch?v=qm_LGHPXRY8
 6. ^ http://prahaar.in/wari-on-social-media/
 7. ^ http://www.mid-day.com/articles/mans-warkaris-hold-kirtan-to-protest-against-delay-in-arrest-of-dabholkars-murderers/15110067
 8. ^ fb.com/akshaywarii
 9. ^ http://varkariyuva.blogspot.in/2015/06/blog-post_29.html
 10. ^ https://www.facebook.com/photo.php?fbid=1072636446123821&set=a.130980873622721.37711.100001324275400&type=3&theater