एकनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संत एकनाथ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
एकनाथ 
महाराष्ट्रातील एक संत
Eknath 2003 stamp of India.jpg
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखइ.स. १५३३ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान)
महाराष्ट्र
मृत्यू तारीखइ.स. १५९९
व्यवसाय
 • कवी
 • तत्वज्ञानी
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Eknath (es); একনাথ (bn); એકનાથ (gu); Eknath (ast); Экнатх (ru); एकनाथ (mr); एकनाथ, संत (gom-deva); Eknath (sq); 阿克那斯 (zh); ایک ناتھ (pnb); ایک ناتھ (ur); Eknath (id); Eknath (nl); संत एकनाथ (sa); saint eknath (hi); ಸಂತ ಏಕನಾಥ್ (kn); Sant Ekanath (gom-latn); Eknath (en); ఏకనాథుడు (te); Sant Ekanath (gom); ஏகநாதர் (ta) ভারতীয় সাধক কবি (bn); Marathi Bhakti sant-poet of Hinduism (en); महाराष्ट्र के एक संत (hi); महाराष्ट्रातील एक संत (mr); filosoof (nl) Эканатх, Эканатха (ru); एकनाथ सूर्यनारायण पैठणकर, संत एकनाथ (mr); Bharud, Sant Eknath (en); सन्त एकनाथ (hi)
संत एकनाथ मंदिर, पैठण

जीवन[संपादन]

संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.


एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी [[गृहस्

पुरुष भास्करपंत कुलकर्णी, प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले आणि द्वारपाल म्हणुन नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हे ही काव्य त्यांनींच लिहीले आहे. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांनींच लिहीले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेक रचना अभंग गवळणी असे स्फुट लेखन एकनाथ यांनी केले. संत एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते.

गुरुपरंपरा[संपादन]

एकनाथांची गुरुपरंपरा :

 1. नारायण (विष्णू)
 2. ब्रह्मदेव
 3. अत्री ऋषी
 4. दत्तात्रेय
 5. जनार्दनस्वामी
 6. एकनाथ

कार्य व लेखन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

एकनाथ, त्यांचे कार्य आणि त्यांची ग्रंथरचना यांवर अनेक पुस्तके लिहिली गेली, आणि अजूनही लिहिली जात असतात. त्यांतली काही ही आहेत :

 • एकनाथ गाथा (संपादन साखरे महाराज)
 • श्री एकनाथ : परंपरा आणि प्रभाव (डॉ.र.बा. मंचरकर)
 • भागवतोत्तम संत एकनाथ - (शंकर दामोदर पेंडसे)
 • लोकनाथ (कादंबरी, लेखक - राजीव पुरुषोत्तम पटेल)
 • संत एकनाथ (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
 • संत एकनाथांचा धर्मविचार (डॉ. सुरेखा आडगावकर)
 • संतश्रेष्ठ एकनाथ (दीपक भागवत)

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.