Jump to content

"श्रावण पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २७: ओळ २७:
* फाल्गुनात [[होळी पौर्णिमा]]
* फाल्गुनात [[होळी पौर्णिमा]]

==भुजरिया==
राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे भाद्रपद वद्य प्रतिपदेला, मध्य प्रदेशातील गावांमध्ये भुजरिया नावाचा सण साजरा होतो. या सणादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक व्यक्ती भुजरियाची देवाणघेवाण करताना दिसतात. या दिवशी देशात समृद्धी आणि शांती रहावी अशी कामना केली जाते. गावातील लोकांमधील जातिभेद दूर होऊन सद्‌भाव नांदावा यासाठी हा सण उत्साहात साजरा होतो. भुजरिया पर्वाच्या दिवशी विविध संस्था भुजरिया संमेलन भरवतात.

भुजरिया सणाच्या निमित्ताने घरात राखून ठेवलेल्या गव्हाच्या बियाणांची गुणवत्ता तपासली जाते. या सणाच्या दिवसाआधी, म्हणजे श्रावण शुक्ल नवमीला एका बांबू आणि मोहाच्या पानांनी बनलेल्या टोपलीत माती भरून तीत कोठारात बिजाणे म्हणून जपून ठेवलेल्या गव्हाचे थोडे दाणे पेरतात. भुजरियाच्या दिवशी टोपलीत उगवलेली कोवळी रोपे उपटून ती तलावावर किंवा नंतर त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात. नंतर गावकरी त्या रोपांची आपआपसात देवाणघेवाण करून त्यांची गुणवत्ता तपासतात. या सणाच्या दिवशी तलावांवर जत्रेचे वातावरण असते.

गव्हाच्या या कोवळ्या रोपांना भुजलिया किंवा कजलिया म्हणतात. काही पंचांगांत या सणाचे नाव कजलिया पर्व असे दिलेले आढळते.

== हे ही पहा ==
== हे ही पहा ==

२१:१५, १० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

श्रावण पौर्णिमा ही श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.

या दिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा विधी सांगितलेला आहे. आजही वैदिक धर्म पाळणाऱ्या बऱ्याच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते. या विधीला श्रावणी म्हणतात. बौद्ध धर्मीयांसाठी सुद्धा हा सण वेगळ्या कारणासाठी महत्त्वाचा आहे. जानवी बदलण्यासाठी श्रावणी पौर्णिमेखेरीज व्यक्तीच्या पोटजातीनुसार अन्य काही दिवसही सांगितले गेले आहेत.

ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते.

बौद्ध धर्म

श्रावणी पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा एक सण आहे. बौद्ध भिक्खूंचा आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास असतो. तीन महिन्यांच्या काळात भिक्खू एका जागी निवास करून धम्माचा अभ्यास व ध्यान साधनेचे चिंतन नमन करीत असतात. तसेच तेथील लोकांना बुद्ध वंदना शिकवून सत्धम्माचा उपदेश करीत असतात. या दिवशी बौद्ध भिक्खू लोकांना धम्माचे नियम व परंपरा यांचे मार्गदर्शन करून सद्वर्तनी बनविण्याचा प्रयत्न करीत असतात.

नारळी पौर्णिमा

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. मासेमारीसाठी सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. हा काळ माश्यांच्या प्रजनन काळाचा म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की मग मच्छीमारांच्या नावा पुनश्च सागर संचारास सिद्ध होतात. हिंदू कोळी समाज वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आला आहे.

रक्षाबंधन

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. त्यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ उत्तरी भारतातला सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.

एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसऱ्या पौर्णिमेला असते.

पौर्णिमेला येणारे हिंदू सण आणि उत्सव

भुजरिया

हे ही पहा