वरुण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वरुण

मकर वाहनावर आरूढ झालेला वरुण (इ.स. १८२०)

पाणी, समुद्र, पाताळ - इत्यादींची अधिपती देवता

मराठी वरुण
निवासस्थान स्वर्गीय समुद्र
वाहन मकर
शस्त्र पाश, वरुणास्त्र
पत्नी वारुणी

वरुण ही वैदिक हिंदू धर्मानुसार पाण्याचा व स्वर्गीय सागराचा अधिपती देव मानला जातो. ऋग्वेदकाळात वरुणाला महत्त्वाचे स्थान होते; उत्तर काळात वरुणाला पाताळ व सर्व प्रकारांच्या जलराशींवर आधिपत्य असणाऱ्या देवाचे स्वरूप पावले.