पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
प्रदेश महाराष्ट्र, कर्नाटक
मालक भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ४६८ किमी (२९१ मैल)
ट्रॅकची संख्या १/२
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण नाही
कमाल वेग १०० किमी/तास

पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग पुणे येथे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गापासून वेगळा होतो व दक्षिणेकडे धावतो. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमधून जाणारा ४६८ किमी लांबीचा हा मार्ग कर्नाटकातील लोंढा ह्या लहान गावामध्ये हुबळी-गोवा रेल्वेमार्गाला जुळतो. महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव इत्यादी महत्त्वाची शहरे ह्याच मार्गावर आहेत. कोकण रेल्वे चालू होण्याअगोदर गोव्याला रेल्वेमार्गाने जोडणारा हा एकमेव दुवा होता.

मे २०१६ मध्ये भारत सरकारने पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना जाहीर केली.