हॅरी ट्रुमन
| हॅरी एस. ट्रुमन | |
|
|
|
| सही | |
|---|---|
हॅरी एस. ट्रुमन (मे ८, इ.स. १८८४ - डिसेंबर २६, इ.स. १९७२) हा अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रुमन हे इ.स. १९४५ ते इ.स. १९५३ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होते.
परिचय [संपादन]
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते शेतकरी आणि व्यापारी होते. इ.स. १९२० साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला.डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून सर्वप्रथम इ.स. १९३४ मध्ये सिनेटवर निवडून गेले. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी ते फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात इ.स. १९४४ मध्ये उपराष्ट्राध्यक्ष झाले व रूझवेल्टच्या मृत्यूनंतर इ.स. १९४५ साली आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर आले.
कामगिरी [संपादन]
जपानवर अणुबॉंब टाकण्याचा निर्णय यांनीच घेतला होता. साम्यवादाच्या प्रसाराच्या विरोधात इ.स. १९५० मध्ये कोरियामध्ये अमेरिकी सैन्य पाठवले. सोव्हियत रशिया व अमेरिकेतील शीतयुद्धाचा प्रारंभ हॅरी ट्रुमन यांच्या काळातच झाला.
बाह्य दुवे [संपादन]
- व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय. (इंग्लिश मजकूर)
- हॅरी ट्रुमन: अ रिसोर्स गाइड (हॅरी ट्रुमन: संसाधनांची मार्गदर्शिका). लायब्ररी ऑफ काँग्रेस. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||