चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ
சென்னை பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்
Chennai airport front view.jpeg
आहसंवि: MAAआप्रविको: VOMM
MAA is located in तमिळनाडू
MAA
MAA
तमिळनाडूमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार पब्लिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा चेन्नई महानगर
स्थळ तिरुसुलम, तमिळनाडू, भारत
हब
समुद्रसपाटीपासून उंची 52 फू / 16 मी
गुणक (भौगोलिक) 12°58′56″N 80°9′49″E / 12.98222, 80.16361
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
07/25 12,001 3,658 डांबरी
12/30 6,708 2,045 डांबरी-काँक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी १,३८,११,१९१
सामान वाह्तुक टनामध्ये ३,००,४९७
विमान १,२४,७१२
स्रोत: भाविप्रा,[१][२]

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MAAआप्रविको: VOMM) (तमिळः சென்னை பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या चेन्नई शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेन्नई विमानतळ चेन्नई महानगराच्या दक्षिण भागात तिरुसुलम, मीनांबक्कम व पल्लावरम ह्या तीन उपनगरांमध्ये स्थित आहे. २०१४ साली १.३८ प्रवाशांची वाहतूक करणारा चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतामधील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. ह्या विमानतळाच्या देशांतर्गत सेवेसाठी वापरात असलेल्या टर्मिनलला के. कामराज ह्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्याचे तर आंतरराष्ट्रीय टर्मिनलला सी.एन. अण्णादुराईचे नाव देण्यात आले आहे. भारतामधील अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपनींचे प्रमुख वाहतूकतळ चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दक्षिण क्षेत्राचे मुख्यालय देखील येथेच स्थित आहे.

इतिहास[संपादन]

मीनांबक्कम येथील जुने टर्मिनल/विमानतळ

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाहुन १९५४ मध्ये एअर इंडियाचे पहिले उड़्डाण मुंबई करिता बेळगाव मार्गे झाले होते. पहिला विमान टर्मिनल हवाई पट्टीच्या ईशान्य बाजूस बांधण्यात आले होते, की जे मीनांबक्कम उपनगराच्या बाजूने होते, त्यामूळे ह्या विमानतळाचे नाव मीनांबक्कम विमानतळ असे पडले. कालांतराने तिरूसुलम मध्ये नवीन टर्मिनल बांधण्यात आले व येथून नवीन प्रवासी सुविधा सुरु करण्यात आल्या. जुन्या मीनांबक्कम टर्मिनल इमारतीचा वापर सध्या मालवाहतूकीसाठी करण्यात येतो.

स्थापत्यप्रकार[संपादन]

चेन्नई विमानतळ/रात्रीचे दृश्य

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तीन टर्मिनल आहेत. मीनांबक्कम येथील जुने टर्मिनल आता मालसामानासाठी वापरले जाते तर तिरुसुलम येथील अंदर्देशीय व आंतरराष्ट्रीय अशी दोन नवीन टर्मिनल प्रवासी वापरता. यांना कामराज टर्मिनल आणि अण्णा टर्मिनल अशी नावे आहेत. ही दोन प्रवासी टर्मिनल जोडलेली आहेत.

परिवहन दुवे[संपादन]

चेन्नई विमानतळ राष्ट्रीय महामार्ग ४५ ह्या महामार्गावर स्थित आहे ह्यामुळे रस्त्याद्वारे ह्या विमानतळावर पोचणे सुलभ होते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे तिरुसुलम हे स्थानक देखील येथून जवळच स्थित आहे. बांधकाम चालू असलेल्या चेन्नई मेट्रोचा मार्ग १ चे दक्षिणेकडील टोक येथेच आहे. मेट्रोद्वारे हा विमानतळ चेन्नईमधील बहुतेक सर्व महत्त्वाच्या स्थळांसोबत जोडला जाईल.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

प्रवासी सेवा[संपादन]

येथे थांबलेले स्पासजेटचे बोईंग ७३७ विमान
विमान कंपनी गंतव्य स्थान टर्मिनल
एअर अरेबिया शारजा अण्णा
एअरएशिया क्वालालंपूर अण्णा
एअरएशिया इंडिया बंगळूर कामराज
एअर ऑस्ट्राल बँकॉक, सेंट डेनिस (रेयूनियों) अण्णा
एअर कोस्टा अहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, विजयवाडा, विशाखापट्टणम कामराज
एअर इंडिया कोलंबो, दुबई, कुवेत, माले, मस्कत, शारजा, सिंगापूर अण्णा
एअर इंडिया अहमदाबाद, बंगळूर, दिल्ली, गोवा, हैदराबाद, कोची, कोलकाता, कोळिकोड, मदुराई, मुंबई, पोर्ट ब्लेअर, तिरुअनंतपुरम कामराज
एअर इंडिया एक्सप्रेस क्वालालंपूर, सिंगापूर, तिरुचिरापल्ली अण्णा
एअर मॉरिशस मॉरिशस अण्णा
ब्रिटिश एअरवेज लंडन अण्णा
कॅथे पॅसिफिक हाँग काँग अण्णा
एमिरेट्स दुबई अण्णा
एतिहाद एअरवेज अबु धाबी अण्णा
फ्लायदुबई दुबई अण्णा
गोएअर भुवनेश्वर, मुंबई, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे, रांची कामराज
गल्फ एअर बहरैन अण्णा
इंडिगो दुबई, सिंगापूर अण्णा
इंडिगो अहमदाबाद, बंगळूर, भुवनेश्वर, कोइंबतूर, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोची, कोलकाता, मुंबई, पुणे, रायपूर, तिरुअनंतपुरम, विशाखापट्टणम कामराज
जेट एरवेझ अबु धाबी, कुवेत, सिंगापूर अण्णा
जेट एरवेझ अमृतसर, बंगळूर, भुवनेश्वर, चंदीगढ, दिल्ली, गोवा, इंदूर, जयपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, पोर्ट ब्लेअर, वडोदरा कामराज
जेटकनेक्ट अहमदाबाद, बंगळूर, कोइंबतूर, दिल्ली, गोवा, हैदराबाद, इंदूर, कोची, कोलकाता, लखनौ, मदुराई, मंगळूर, मुंबई, रायपूर, तिरुअनंतपुरम, तिरुचिरापल्ली कामराज
कुवेत एअरवेज कुवेत अण्णा
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट विमानतळ अण्णा
मलेशिया एअरलाइन्स क्वालालंपूर अण्णा
मालदीव्हियन ढाका, माले अण्णा
ओमान एअर मस्कत अण्णा
कतार एअरवेज दोहा अण्णा
सौदिया दम्मम, जेद्दाह, रियाध अण्णा
सिल्कएअर सिंगापूर अण्णा
सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर अण्णा
स्पाइसजेट कोलंबो अण्णा
स्पाइसजेट अहमदाबाद, बागडोगरा, बंगळूर, बेळगाव, कोइंबतूर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हुबळी, हैदराबाद, जयपूर, कोची, कोलकाता, कोळिकोड, मदुराई, मंगळूर, मुंबई, पोर्ट ब्लेअर, पुणे, सुरत, तिरुअनंतपुरम, तुतिकोरिन, विजयवाडा, विशाखापट्टणम कामराज
श्रीलंकन एअरलाइन्स कोलंबो, हंबन्टोटा अण्णा
थाई एअरवेज बँकॉक अण्णा
टायगरएअर सिंगापूर अण्णा

अपघात व दुर्घटना[संपादन]

ऑगस्ट १९८४मध्ये विमानतळापासून १.२ किमी अंतरावर झालेल्या बॉम्बस्फोटात ३३ व्यक्ति ठार तर २७ जखमी झाले होते.[३]

संदर्भदुवे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]