लुफ्तान्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुफ्तान्सा
250px
आय.ए.टी.ए.
LH
आय.सी.ए.ओ.
DLH
कॉलसाईन
लुफ्तान्सा
स्थापना १९२६, १९५४मध्ये पुनर्स्थापना
हब फ्रांकफुर्ट, म्युनिक, ड्युसेलडोर्फ
मुख्य शहरे बर्लिन, हांबुर्ग, माल्पेन्सा, श्टुटगार्ट
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या लुफ्तान्सा कार्गो, लुफ्तान्सा सिटीलाइन, लुफ्तान्सा इटालिया, लुफ्तान्सा प्रादेशिक, लुफ्तान्सा टेकनिक
विमान संख्या २७४ (+७३ येणे), ७५६ (+१५६ येणे) उपकंपन्यांसह
मुख्यालय फ्रांकफुर्ट
प्रमुख व्यक्ती वोल्फगांग मेरहुबर
संकेतस्थळ http://www.lufthansa.com

दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमानवाह्तुक कंपनी असून मुळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसर्‍या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते.[१] लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत.[२]

लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे.[१][३][४][५] लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत.[६] लुफ्तांसाकडे १,१७,००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली (यात ब्रसेल्स एरलाइन्स आणि जर्मनविंग्सच्या प्रवाशांची गणती नाही).

लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ "डिरेक्टरी:वर्ल्ड एरलाइन्स", Flight International, २००७-०४-०३ (इंग्लिश मजकूर), पृ. १०७. 
  2. "लुफ्तान्सा ताफा (इंग्लिश मजकूर)"
  3. We hereby invite our shareholders to attend the 51st Annual General Meeting. investor-relations.lufthansa.com. August 25, 2009 रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
  4. How to get there. lac.lufthansa.com. July 30, 2002 रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
  5. "Lufthansa opens new office complex in Frankfurt (Lufthansa eroffnet neue Konzernzentrale in Frankfurt)", Europe Intelligence Wire. (इंग्लिश मजकूर) 
  6. "Lufthansa Flies to 50-Year Milestone", डॉइच वेल, २००५-०१-०४. (इंग्लिश मजकूर)