बिजु पटनायक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बिजु पटनायक विमानतळ
भुवनेश्वर विमानतळ
Biju Patnaik Airport BBSR.jpg
आहसंवि: BBIआप्रविको: VEBS
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा भुवनेश्वर
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर १३८ फू / ४२ मी
गुणक (भौगोलिक) 20°14′40″N 085°49′04″E / 20.24444, 85.81778
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ४,५२४ १,३७९ डांबरी धावपट्टी
१४/३२ ७,३५९ २,२४३ डांबरी धावपट्टी

बिजु पटनायक विमानतळ (आय.ए.टी.ए.: BBIआय.सी.ए.ओ.: VEBS),हे भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेले विमानतळ आहे.यास 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणुनही ओळखतात.हे सध्या ओरिसात असलेले एकमेव मोठे विमानतळ आहे.याचे नामाभिधान बिजू पटनायक पूर्व मुख्यमंत्री यांचेवरुन करण्यात आले. ते एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते.

अनुक्रमणिका

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडा [संपादन]

ओरिसामध्ये जलदगतीने बदलणार्‍या औद्योगिकीकरणाचा वेग बघता,भा.वि.प्रा.ने नुकतेच सन २०१० पर्यंत या विमानतळाचे संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीयकरण करण्याच्या आराखड्यास मंजूरीची घोषणा केली आहे.यात भा.वि.प्रा. हे रुपये २५० करोड गुंतवणार आहे.[१].यासाठी ओडिशा राज्य सरकारने साचा:Convert/acreइतकी जमिन धावपट्टीच्या विस्तारीकरणास,जी बोइंग-७४७ हाताळु शकेल, दिली आहे.या धावपट्टीचे वाढीव काम सप्टेंबर २००६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती राहतील.येथे क्ष-किरण मशीनचीही व्यवस्था राहील.याची क्षमता ३० विमाने प्रती तास हाताळण्याची होईल.यात वाणिज्यिक संकुल,हॉटेल व ईतर सोयीपण विमानतळाजवळ राहतील.एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगु शकतील.भा.वि.प्र. हे झारसुगुडायेथे ओरिसाच्या पश्चिम भागात,दुसरे मुख्य विमानतळ करण्याच्या बेतात आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान [संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
इंडियन एरलाइन्स चेन्नई, दिल्ली, मुंबई
इंडिगो एरलाइन्स दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद
जेटलाईट दिल्ली, कोलकाता
किंगफिशर एरलाइन्स दिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकाता

संदर्भ [संपादन]

  1. भा.वि.प्रा. रु. २५० करोड भुवनेश्वर विमानतळात गुंतविणार (इंग्लिश मजकूर) जुलै २२,२००६

बाह्य दुवे [संपादन]