नागालँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?नागालँड
भारत
—  राज्य  —
गुणक: 25°24′N 94°05′E / 25.4, 94.08
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १६,५७९ चौ. किमी (६,४०१ चौ. मैल)
राजधानी कोहिमा
मोठे शहर दीमापुर
जिल्हे 11
लोकसंख्या
घनता
१९,८८,६३६ (24th)
• १२०/km² (३११/sq mi)
भाषा इंग्रजी
राज्यपाल निखिल कुमार
मुख्यमंत्री नैफीउ रीयो
स्थापित १ डिसेंबर इ.स. १९६३
विधानसभा (जागा) Unicameral (60)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-NL
संकेतस्थळ: Nagaland.nic.in
नागालँड चिन्ह

गुणक: 25°24′N 94°05′E / 25.4, 94.08


नागालँडNagaland.ogg उच्चार ईशान्य भारतातील एक राज्य आहे.

इतिहास[संपादन]

नागभूमीत राहणार्‍यांना किरात म्हंटले जाते. नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, लेंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा सार्‍या किरातांची 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचे कुलचिन्ह आहे. या जनजातीचा प्रमुख देव सूर्य आहे. तसेच प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाण स्वरुप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष . रैंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर चंद्र हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते असे दिसून येते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद याची पत्नी नागभुमीची होती असे दिसून येते.

भूगोल[संपादन]

जिल्हे[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - नागालँडमधील जिल्हे

नागालँड राज्यात ८ जिल्हे आहेत.

नागालँड हे ईशान्य भारतातील राज्य आहे. ह्यच्या सिमेवर पश्चिमेला आसाम,उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग , पूर्वेकडे म्यानमार देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. राज्याची राजधानी कोहिमा आहे आणि सर्वात मोठे शहर दिमपूर आहे.याचे क्षेञफळ 16,579 ग्र वर्ग किमी आहे.