हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
香港國際機場
A bird's eye view of Hong Kong International Airport.JPG
आहसंवि: HKGआप्रविको: VHHH
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
प्रचालक हाँग काँग विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा हाँग काँग
स्थळ चेक लाप कोक, हाँग काँग
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर २८ फू / ९ मी
गुणक (भौगोलिक) 22°18′32″N 113°54′52″E / 22.30889, 113.91444
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी ५,६०,५७,७५१

हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: HKGआप्रविको: VHHH) हा हाँग काँग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेप लाक कोक नावाच्या एका कृत्रीम बेटावर बांधला गेलेला हा विमानतळ १९९८ सालापासून वापरात आहे. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या हाँग काँग विमानतळाची मुख्य इमारत १९९८ साली सर्वात मोठी विमानतळ इमारत होती. २०१२ साली सुमारे ५.६ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला तसेच येथून ४०,६०,२८१ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली ज्याबाबतीत ह्याचा जगात पहिला क्रमांक आहे.

कॅथे पॅसिफिक, ड्रॅगनएअर, यू.पी.एस. एरलाइन्स इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा हाँग काँग विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १५० हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.


बाह्य दुवे[संपादन]