वडोदरा विमानतळ
| वडोदरा विमानतळ हरणी विमानतळ |
|||
|---|---|---|---|
| आहसंवि: BDQ – आप्रविको: VABO | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
| प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| कोण्या शहरास सेवा | वडोदरा | ||
| उन्नतन(एलिव्हेशन) सरासरी समुद्र- सपाटीच्या वर | १२७ फू / ३८.७ मी | ||
| गुणक (भौगोलिक) | |||
| संकेतस्थळ | |||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| फू | मी | ||
| ०४/२२ | ८,१०० | २,४६९ | डांबरी धावपट्टी |
वडोदरा विमानतळ (आय.ए.टी.ए.: BDQ, आय.सी.ए.ओ.: VABO) गुजरातच्या वडोदरा शहरातील विमानतळ आहे. याला हरणी विमानतळ असेही नाव आहे.
वडोदरा वायुसेना तळ या विमानतळाशी संलग्न आहे. काही वर्षांत या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा बेत आहे.
अनुक्रमणिका |
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]
| विमान कंपनी | गंतव्य स्थान |
|---|---|
| एर इंडिया स्थानिक | दिल्ली |
| इंडिगो | बंगळूर,चेन्नई, दिल्ली, कोलकाता,मुंबई |
| जेट एरवेज | दिल्ली,मुंबई |
टर्मिनल्स[संपादन]
सध्याचे टर्मिनल अगदी छोटे आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन टर्मिनलची पायाभरणी फेब्रुवारी २६, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. याची रचना करण्यासाठी स्पर्धेतून पात्र ठरलेल्या जेन्सलर, फ्रेडरिक श्वार्त्झ आणि क्रियेटिव्ह ग्रूप या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.[१][२] २०१०च्या अखेरपर्यंत तयार होणाऱ्या या टर्मिनलची क्षमता ताशी ७०० (५०० अंतर्देशीय तर २०० आंतरराष्ट्रीय) प्रवासी हाताळण्याची असेल. याचा व्याप १८,१२० चौ.मी. व्याप असून तेथे १८ चेक-इन अधिकाऱ्यांची व्यवस्था असेल.
सध्या या विमानतळावरुन मालसामानाची वाहतूक होत नाही.
हेही पाहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ↑ Foundation Stone for New Integrated Terminal Laid at Vadodara - PIB Press Release
- ↑ Vadodara Airport new terminal design - Frederic Schwartz Architects
बाह्य दुवे[संपादन]
- Civil Airport Harni (official Airports Authority of India web site)
- विमानतळ माहिती VABO वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
गुणक: