सिंगापूर चांगी विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा विमानतळ आग्नेय आशियातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय वाहतुककेंद्र आहे. सोयी व सुविधांच्या दृष्टीने चांगी विमानतळ जगात सर्वोत्तम समजला जातो. सिंगापूर एअरलाईन्स ह्या विमान वाहतुककंपनीचे मुख्यालय व परिचालनकेंद्र चांगी विमानतळावर आहे.