औरंगाबाद विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
औरंगाबाद विमानतळ
चिकलठाणा विमानतळ
औरंगाबाद विमानतळ
आहसंवि: IXUआप्रविको: VAAU
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ औरंगाबाद, महाराष्ट्र
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर १,९११ फू / ५८२ मी
गुणक (भौगोलिक) 19°51′46″N 075°23′53″E / 19.86278, 75.39806
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ७,७१३ २,३५१ काँक्रिट/डांबरी धावपट्टी

औरंगाबाद विमानतळ(आहसंवि: IXUआप्रविको: VAAU)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद येथे असलेले विमानतळ आहे.यास 'चिकलठाणा विमानतळ' असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
इंडियन एरलाइन्स दिल्ली,मुंबई
जेट एरवेज मुंबई
जेटलाईट दिल्ली
किंगफिशर एरलाइन्स मुंबई


चित्रदालन[संपादन]

प्रकल्पाचा इतिहास[संपादन]

१९९०व्या दशकाच्या सुरुवातीला,महाराष्ट्र शासनाने हा विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याने अजिंठा, वेरुळला येणाऱ्या पर्यटकांच्या सोय होणार होती.पण अपूऱ्या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही.सन १९९०च्या शेवटी,सरकारने हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकारासाठीची जपान बँक ह हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला.त्याचेसोबतच त्या परिसराचा विकास अशी अनेक कामेही त्यात अंतर्भूत होती. प्रथम चरणासाठी यात रुपये ८१.७१ करोड हवे होते.त्यपैकी रुपये ६९.४८ करोड जेबीआयसी ने दिले.उरलेल्यापैकी ३०० करोड रुपये जेबीआयसीने दुसऱ्या चरणात दिले. बाकी ६० करोड रुपये अंमलबजावणी करणाऱ्याने टाकावयाचे होते.

उच्चस्तरीकरण[संपादन]

पर्यटकाची वाहतूक सुलभपणे व्हावी म्हणुन तसेच,विकासाचा एक भाग म्हणुन,या विमानतळावरील सुविधा १३० करोड रुपये खर्चुन वाढवाव्यात,असा निर्णय घेण्यात आला.प्रथम चरणात,धावपट्टीची लांबी वाढविणे व बळकट करणे, नविन टॅक्सीवे,सीमेवर भिंत तसेच इतर सुविढांचा अंतर्भाव होता.हे काम सन २००५ मध्ये पूर्ण करण्यात आले.
दुसऱ्या चरणाचा भाग म्हणुन संयुक्त टर्मिनल इमारतीचे बांधकाम करण्यात आले.तांत्रिक संकुल बांढण्यात आले जेणेकरुन,देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे हाताळु शकता येतील.दुसऱ्या चरणास सुमारे ९९.६७ करोड रुपये इतका खर्च आला.नोव्हेंबर २००८ मध्ये अखेर हे विमानतळ तयार झाले. येथे असलेली सर्वात बिकट समस्या म्हणजे,विमाने ठेवण्यास जागा.जुना ऍप्रन हा फक्त एका मोठ्या आकाराच्या विमानास सामावु शकत होता.याने आवागमनास बाधा होत होती.याचा परिपाक म्हणुन, विदेशी पाहुण्यांची खाजगी विमाने येथे ठेवता येउ शकत नव्हती. त्यामुळे दुसऱ्या चरणात,५०० x ४०० फूटाचा ऍप्रन तयार करण्यात आला.त्यामुळे येथे चार मोठ्या आकाराची विमाने ठेवता येऊ शकत होती.त्यामुळे जुन्या व नव्या ऍप्रन मिळुन सहा विमानांना जागा झाली.त्याने आंतरराष्ट्रीय वाहतूक वाढली.

उदघाटन[संपादन]

या विमानतळाच्या नुतनीकरणाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखयांच्या हस्ते २१ नोव्हेंबर २००८ रोजी झाले.उदघाटनाची विमानसेवा ही जेद्दाहला जाणारी होती.त्यात हजयात्रेकरु होते.दि. ३ मार्च २००९ रोजी हा विमानतळ सर्व वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

संदर्भ[संपादन]

साचा:No footnotes

बाह्य दुवे[संपादन]