छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
| छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ छ्त्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ |
|||
|---|---|---|---|
| 242px | |||
| आहसंवि: BOM – आप्रविको: VABB | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
| मालक | GVK, भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| प्रचालक | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादीत(MIAL) | ||
| कोण्या शहरास सेवा | मुंबई | ||
| स्थळ | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
| हब | |||
| उन्नतन(एलिव्हेशन) सरासरी समुद्र- सपाटीच्या वर | ३७ फू / ११ मी | ||
| गुणक (भौगोलिक) | |||
| संकेतस्थळ | |||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| मी | फू | ||
| १४/३२ | २,९२५ | ९,५९६ | डांबरी धावपट्टी |
| ०९/२७ | ३,४४५ | ११,३०२ | डांबरी धावपट्टी |
| सांख्यिकी (२००८-२००९) | |||
| प्रवासी | २४,३००,०००[१] | ||
| कार्गो हाताळणी | ५३०,२७८ टन | ||
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आंहवासंविको: BOM, आंहप्रवासंविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १००० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील सांताक्रुझ उपनगरात स्थित हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण एशियातील प्रवासी वाहतुकीचे संदर्भात,सर्वात व्यस्त विमानतळ आहे.[२][३] यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते.
अनुक्रमणिका |
[संपादन] विमानतळाची माहिती
[संपादन] तांत्रिक माहिती
- IATA नाव: BOM
- ICAO नाव: VABB
- स्थान : 19°05′19″N, 72°52′05″E
- टर्मिनल १ए १बी - राष्ट्रीय उड्डाणे
- टर्मिनल २ए २बी २सी - आंतरराष्ट्रीय उड्डाणे
इ.स. २००५चे सरासरी आकडे-
- ६०० व्यावसायिक उड्डाणे
- १ कोटी ७५ लाख प्रवासी
- ४०,०००० टन सामानवाहतूक (कार्गो)
हा विमानतळ एर इंडिया आणि जेट एरवेझचे मुख्य विमानतळ आहे. येथून सध्या ४६ आंतरराष्ट्रीय विमानकंपन्या सेवा पुरवतात. याशिवाय इंडियन, जेट लाइट, गो एर, डेक्कन, स्पाइसजेट, इंडिगो एरलाइन्स व किंगफिशर एरलाइन्स या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. या विमानतळावर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:३० दरम्यान दिवसातील ४५% उड्डाणे होतात. रात्री १०:०० नंतर बव्हंश आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात.
[संपादन] इतिहास
मुंबईत सुरुवातीस जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होता. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे तरी हा नवीन विमानतळ आतल्या बाजूस सांताक्रुझ उपनगरात बांधण्यात आला. इ.स. १९४८मध्ये येथील बांधकाम झाले व जून १९४८मध्ये एर इंडियाने येथील पहिले प्रवासी उड्डाण लंडनला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हियेशन मंत्रालयाच्या अंमलात आला. याला नुसते सांताक्रुझ विमानतळ असेच नाव देण्यात आले होते. १९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस सहार गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण/अवतरणे तेथून सुरू झाली.
२००६मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित कंपनीने जी.व्ही.के. इंडस्ट्रीझ लिमिटेड आणि एरपोर्ट्स कंपनी साउथ आफ्रिका या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले आहे.
[संपादन] सांख्यिकी
हा विमानतळ भारतीय उपखंडातील दुसर्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. ऑफिशियल एरलाइन गाइड (ओएजी)ने मुंबई-दिल्ली मार्गाला साप्ताहिक उड्डाणांनुसार जगातली सातव्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त मार्ग म्हणून मान्यता दिली आहे.
एप्रिल २००६ ते फेब्रुवारी २००७ दरम्यान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,८०,००० उड्डाणे व उतरणे झाली तर २,००,००,००० प्रवाशांनी येथून ये-जा केली, पैकी १,३५,६०,००० प्रवास देशांतर्गत उड्डाणांवर होते तर ६७,३०,००० प्रवासी परदेशास आले-गेले. २००५-६ मधील याच काळापेक्षा हा आकडा २१.२८% जास्त आहे.[४]
[संपादन] रचना
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मुख्य टर्मिनले आहेत. टर्मिनल १ (सांताक्रुझ) देशांतर्गत तर टर्मिनल २ (सहार) आंतरराष्ट्रीय उड्डाण-अवतरणांसाठी वापरली जातात. दोन्ही टर्मिनलवरुन निघालेली विमाने एकाच धावपट्टी व इतर सुविधांचा (एरसाइड सर्व्हिसेस) उपयोग करतात.
[संपादन] सुविधा[५]
| सुविधा | प्रस्तावित | सध्या |
|---|---|---|
| विमाने थांबण्याचे गाळे | १०६ | ९२ |
| विमानात चढण्यासाठीचे पूल | ६६ | १९ |
| चेक-इन टेबले | ३३९ | १८२ |
| कार पार्किंग | १२,००० | ३,६०० |
गेल्या काही वर्षांत धावपट्टीवरील ताण कमी करण्यासाठी नवीन टॅक्सीवे बांधले गेले आहेत. एकाच माहितीदर्शकावर सांताक्रुझ आणि सहार अशा दोन्ही विमानतळांवरील विमानांच्या आवागमनाची माहिती देण्यासाठीची प्रणालीही विकासाधीन आहे. ही माहिती एर ट्राफिक कंट्रोल, एरपोर्ट रॅम्प, विमानतळांची संकेतस्थळे तसेच आसपासच्य हॉटेलांमध्येही एकाच वेळी प्रसारित करण्याचाही प्रयत्न असेल. जरी अजून एक धावपट्टी बांधणे शक्य नसले तरी विमानांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा मिळावी यास्तव एटीसी टॉवरची जागा बदलण्यात येणार आहे.
विमानतळावर वायफाय सुविधा फुकट उपलब्ध आहे.[६]
[संपादन] विमानसेवा व गंतव्यस्थान
[संपादन] संदर्भ
- ↑ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अधिकृत संकेतस्थळ)
- ↑ http://www.thaindian.com/newsportal/business/mumbai-airports-traffic-control-tower-design-bags-award_100221024.html
- ↑ http://www.business-standard.com/india/news/mumbai-airport-plans-rs-2280-cr-investment-this-fiscal/94602/on
- ↑ मुंबई विमनातळावर ११ महिन्यांत २ कोटी प्रवाशांची ये-जा
- ↑ CSIA.in
- ↑ Free wi-fi at Mumbai airport
[संपादन] बाह्य दुवे
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादीत (अधिकृत संकेतस्थळ)
- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संकेतस्थळावर.