फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार
award category | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चित्रपट पुरस्कार श्रेणी, फिल्मफेर पुरस्कार | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायिकेला दिला जाणारा पुरस्कार आहे. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी पुरस्कार सोहळ्याची स्थापना १९५४ मध्ये झाली असली तरी, सर्वोत्तम पार्श्वगायकाची श्रेणी १९५९ मध्ये सुरू करण्यात आली होती. हा पुरस्कार सुरुवातीला १९६७ पर्यंत पुरुष आणि महिला गायकांसाठी समान दिला जात असे. पुढील वर्षी (१९६८ पासून) ही श्रेणी विभागली गेली आणि तेव्हापासून दोन पुरस्कार देणे सुरू झाले व पुरुष गायकांसाठी आणि महिला गायकांसाठी स्वतंत्रपणे दिले गेले.
१९५९ मध्ये लता मंगेशकरांना पहिला पुरस्कार मिळाला होता मधुमती चित्रपटातील "आजा रे परदेसी" या गाण्यासाठी. पुढे मंगेशकरांना अजून तीन वेळा पुरस्कार मिळाला. १९६७ पर्यंत वेगळ्या श्रेण्या होण्याआधी फक्त मंगेशकरांना पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहे. पठाण या चित्रपटातील "बेशरम रंग" या गाण्यासाठी २०२४ मध्ये शिल्पा राव यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजवर आशा भोसले व अलका याज्ञिक ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा (३७ वेळा) नामांकन मिळाले आहे.
१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. हा पुरस्कार अनेक वेळा एकाच गाण्यातील दोन गायिकेंना दिला गेला आहे तसाच अनेक वेळा भिन्न गाण्यांसाठी विभागून देखील दिला गेला आहे.
इतिहास
[संपादन]फिल्मफेअर पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये झाली. १९५६ मध्ये चोरी चोरी चित्रपटासाठी शंकर जयकिशन या जोडीला सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळणार होता. कार्यक्रमात जयकिशन यांनी लता मंगेशकरांना ह्या चित्रपटातील प्रसिद्ध गीत "रसीक बलमा" गाण्याची विनंती केली. पण मंगेशकरांना ते गाण्यास नकार दिला व सांगितले की हे गाणे गाण्यासाठी त्यांना कोणताही पुरस्कार मिळाला नाही आहे व त्यामुळे त्या गाणार नाही. द टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक जे.सी. जैन यांनीही मंगेशकरांना गाण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केला आणि उदाहरण दिले की ऑस्कर पुरस्कारांमध्येही गायकांसाठी अशी श्रेणी नसते. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये क्वचितच गाणी असतात, असे मत मंगेशकर यांनी मांडले; आणि समारंभात गाण्यास नकार दिला.[१] सर्वोत्तम पार्श्वगायकाची श्रेणी १९५९ मध्ये सुरू करण्यात आली व मंगेशकरांना पहिला पुरस्कार मिळाला. १९६७ पर्यंत, वेगळ्या श्रेण्या होण्याआधी, फक्त मंगेशकरांना पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहे ज्यात त्यांनी १९५९, १९६३ आणी १९६६ मध्ये पुरस्कार जिंकले. १९६८ पासून वेगवेगळ्या श्रेण्या झाल्यावर पहिला पुरस्कार आशा भोसलेयांनी पटकावला तो दस लाख चित्रपटातील "गरीबों की सुनो" या गाण्यासाठी.
१८ एप्रिल १९७१ रोजी, मंगेशकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला पत्र लिहून त्यांना सर्वोत्तम महिला गायक श्रेणीसाठी कोणतेही पुरस्कार न देण्याची विनंती केली. तिने नमूद केले की "हा पुरस्कार अश्या काही महिला गायकांना देण्यात यावा ज्यांना माझ्या पेक्षा जास्त प्रोत्साहनाची गरज आहे." त्या वर्षी (१९७१ मध्ये) जरी त्यांना नामांकन मिळाले असले तरी पुरस्कार शारदा अय्यंगार यांना मिळाला.[२]
विजेते आणि नामांकन
[संपादन]१९५९ ते १९६७ पर्यंत
[संपादन]वर्ष | विजेत्यांचे चित्र | विजेता | गाणे | चित्रपट |
---|---|---|---|---|
१९५९ | लता मंगेशकर | "आजा रे परदेसी" | मधुमती | |
अन्य नामांकन नाही | ||||
१९६० | - | पुरुष विजेता | ||
लता मंगेशकर | "भैया मेरे राखी के बंधन" | छोटी बहन | ||
१९६१ | - | पुरुष विजेता | ||
लता मंगेशकर | "दिल अपना और प्रीत पराई" | दिल अपना और प्रीत पराई | ||
लता मंगेशकर | "प्यार किया तो डरना क्या" | मुघल-ए-आझम | ||
१९६२ | - | पुरुष विजेता | ||
महिला नामांकन नाही | ||||
१९६३ | लता मंगेशकर | "कहीं दीप जले कहीं दिल" | बीस साल बाद | |
लता मंगेशकर | "आप की नजरों ने समझा" | अनपढ | ||
१९६४ | - | पुरुष विजेता | ||
लता मंगेशकर | "जो वदा किया" | ताजमहाल | ||
१९६५ | - | पुरुष विजेता | ||
लता मंगेशकर | "ज्योत से ज्योत" | संत ज्ञानेश्वर | ||
१९६६ | लता मंगेशकर | "तुम्ही मेरे मंदिर" | खानदान | |
लता मंगेशकर | "एक तू ना मिला" | हिमालय की गोद में | ||
१९६७ | - | पुरुष विजेता | ||
लता मंगेशकर | "लो आगई उनकी याद" | दो बदन | ||
लता मंगेशकर | "आज फिर जीने की तमन्ना है" | गाइड |
१९६८ पासून
[संपादन]अनेक पुरस्कार आणि नामांकन
[संपादन]दोन गायिकांना आजवर हा पुरस्कार सर्वाधिक असा सात वेळा मिळाला आहे: आशा भोसले (१९६८, १९६९, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७९) व अलका याज्ञिक (१९८९, १९९४, १९९८, २०००, २००१, २००२, २००५) ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. त्यांच्या खालोखाल श्रेया घोषालने हा पुरस्कार सहा वेळा जिंकला आहे (२००३, २००४, २००८, २००९, २०१६, २०१९). लागोपाठ असे चार वेळा पुरस्कार मिळवण्यास आशा भोसलेयांना यश मिळाले आहे (१९७२ ते १९७५).
याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा (३७ वेळा) नामांकन मिळाले आहे पण फक्त सात वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल घोषाल यांना २९ वेळा नामांकन मिळून सहा पुरस्कार मिळाले आहे. भोसले (१९७५) आणि याज्ञिक (१९९४) ह्या दोघींना एकाच वर्षी असे चार नामांकन मिळून विक्रम नोंदवला आहे. भोसलेंना प्राण जाये पर वचन ना जाये चित्रपटातील "चैन से हम को कभी" या गाण्यासाठी[३][४] तर याज्ञिकांना खलनायक चित्रपटातील "चोली के पीछे" या गाण्यासाठी इला अरुण यांच्यासोबत हा पुरस्कार मिळाला.
इतर माहिती
[संपादन]१९९४ मध्ये अलका याज्ञिक व इला अरुण यांनी खलनायक चित्रपटातील "चोली के पीछे" या गाण्यासाठी पुरस्कार सामायिक केला.[५][६] २००३ मध्ये असेच देवदास चित्रपटातील "डोला रे डोला" या गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि कविता कृष्णमूर्ती यांनी पुरस्कार सामायिक केला. २०१२ मध्ये देखिल ७ खून माफ चित्रपटातील "डार्लिंग" या गाण्यासाठी उषा उथुप आणि रेखा भारद्वाज यांनी पुरस्कार सामायिक केला.
पुढे २०१० व २०११ मध्ये वेगवेगळ्या गाण्यांसाठी गायिकेंनी पुरस्कार सामायिक केला आहे: २०१० मध्ये कविता सेठ यांनी वेक अप सिड चित्रपटातील "इकतारा" गाण्यासाठी आणि रेखा भारद्वाज यांनी दिल्ली ६ चित्रपटातील "गेंडा फूल" गाण्यासाठी; आणि २०११ मध्ये ममता शर्मा यांनी दबंग चित्रपटातील "मुन्नी बदनाम हुई" गाण्यासाठी आणि सुनिधी चौहान यांनी तीस मार खान चित्रपटातील "शीला की जवानी" गाण्यासाठी.
संदर्भ
[संपादन]- ^ Yatindra Mishra, Ira Pande (२०२३). Lata: A Life in Music. Penguin Random House. p. २२७. ISBN 9789354928895.
- ^ Raju Bharatan (२०१६). Asha Bhosle: A Musical Biography. Hay House. p. ११७. ISBN 9789385827167.
- ^ "The Filmfare Awards Nominations – 1974". The Times Group. 29 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "The Filmfare Awards Winners – 1974". The Times Group. 28 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "The Filmfare Awards Nominations – 1993". The Times Group. 28 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "The Filmfare Awards Winners – 1993". The Times Group. 28 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.